टीम मंगळवेढा टाईम्स ।
मध्ययुगीन भारतात भारतीय स्त्री ही धार्मिक बंधनात खितपत पडलेली होती.त्या स्त्री ला सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक,धार्मिक बाबतीत तुच्छ स्थान होते,स्त्री ही केवळ भोगवस्तु आहे तिला कोणतेही स्थान,दर्जा नाही.अशा विचारसरणी मुळे तत्कालीन स्त्रियांच्या जीवणात सर्वञ अंधार पसरला होता .
सनतनी परंपरेच्या बेड्यामुळे त्यांना जनावराहुन हालाकिचे दिवस काढावे लागत असे त्या अंधारमय युगात एका तेजस्वी दैदिप्यमान समतानायकांनी स्त्री मुक्तीचे पंख मुक्त केले ते म्हणजे महात्मा बसवण्णा .
महात्मा बसवण्णा नी भारतात पहिल्यांदा स्त्रियांना साक्षर बनवून भारतीय इतिहासाला एक वेगळी कलाटणी दिली.
विचार करा त्या काळी पुरूष साक्षर नव्हते तर स्त्रियांची काय विचारण्याची गोष्ट.अशा सनातनी युगात महिलांना संघटित करून साक्षर करुन संघाटित बनविण्याचे ऐतिहासिक कार्य महात्मा बसवण्णा नी १२ व्या शतकात केले.
या ईश्वर निर्मित निसर्गसृष्टीचा व जीवनाचा आनंद घेण्याचा अधिकार पुरुषाप्रमाने स्त्रियांना सुद्धा आहे याची जाणीव त्यांनी तत्कालीन समाजाला करुन देली.व त्याची शिकवण सर्व शरणांनी आमलात आणून स्त्रियांना स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी प्रेरीत केले.
शिवयोगी सिद्धरामेश्वर आपल्या वचनात स्त्रिया बद्दल म्हणतात “स्त्री स्त्री नव्हे,स्त्री राक्षसी नव्हे,स्त्री साक्षात प्रत्यक्ष कपिलसिद्ध मल्लिकार्जुन पहा हो”.
अशा प्रकारे स्त्री ला साक्षात ईश्वरासम मानून स्त्रीच्या जीवनात संजवनी देण्याचे कार्य महात्मा बसवण्णा व शरणांनी केले आहे.
🔯🔯 स्त्रीयांना कायकातून [व्यवसाय] स्वावलंबी करणारे महात्मा बसवण्णा 🔯🔯
कायक [व्यवसाय] हा पुरुष प्रधान म्हणून ओळखला जायचा महात्मा बसवण्णांनी या विचाराला तडा देऊन स्त्रियांना व्यावसायिक स्वातंत्र्य दिले.
“अनुभव मंटपात समावेश करत असतानाचा पहिला नियमच हा होता की स्वताःच्या उदरनिर्वाहा साठी कोणता तरी व्यवसाय करणे अनिवार्य बंधनकारक होते”.
अनुभव मंटपात अनेक स्त्रियांचा समावेश होता.त्या स्वताः कोणताना कोणता कायक करीत असतं.त्यामध्ये काश्मीरची महाराणी “मोळगी महादेवी” या मोळी विकण्याचे कार्य करत.”आय्दक्की लक्कम्मा” या सांडलेले तांदुळ वेचण्याचे कायक करत.”रेमव्वा” या सूत कातण्याचे कायक करत.
रेवम्मा या सौदंर्य प्रसाधने विकण्याचे कायक करत.सोमम्मा या धान्ये कांडण्याचे कायक करत.काळ्ळवा हे सुतारकाम करण्याचे कायक करत.लिंगाम्मा या पानाचा विडा तयार करत असत.
मधुवय्या या पादत्राणे तयार करण्याचे कायक करत असतं.सत्यक्का या झाडलोट करण्याचे कायक करत असत.अक्कम्मा या शेती करण्याचे कायक करत असत.
अशा किती तरी ज्ञात-अज्ञात शरणी आहेत त्यांच्या आत्मविश्वास निर्माण करुन त्यांना कर्तव्यकठोर,स्वावलंबी,स्वाभिमानी बनवून महात्मा बसवण्णांनी ताठ मानेने उभे केले.
🔯🔯 स्त्रियांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारे
युगपुरूष 🔯🔯
स्त्रियांना शिक्षणा बरोबर वैचारिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतात प्रथम बसवण्णा नी दिले.
स्त्रिया फक्त चुलं आणि मुलं यातच गुरफटून न जाता त्यांनी व्यवसाय उद्योग करावा असा क्रांतिकारी विचारांची मांडणी व प्रत्यक्ष त्या विचारांची अमंलबजावनी त्या सनातनी युगात महात्मा बसवण्णानी केले.
स्त्रियांना पुरूषांबरोबर स्थान देऊन अनुभव मंटपातील जागतिक पहिल्या लोकशाहीत स्थांन देऊन त्यांच्या विचारांना,भावनाना मुक्त करण्याचे खुले विचारपिठ निर्माण करून दिले.
स्त्रियांना फक्त धार्मिकता व अध्यात्मवादीच बनविले नाही तर त्यांना विज्ञानवादी बनवून एक सुधारित व आधुनिक समाज घडविण्याचा यशस्वी प्रयत्न बसवण्णा नी केला.
या महात्मा बसवण्णांनी दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर स्वार होऊन विश्वकिर्तीमान प्रस्थापित करणाऱ्या अनेक शरणी आहेत.
त्यामध्ये माता अक्क नागाई,अक्क महादेवी,माता निलांबिका,माता निलांबिका,शरणी अक्कमा,शरणी आय्दक्की लक्कम्मा,उरिलिंगपेंदींची पुण्य स्त्री काळव्वे,शरणी मसणम्मा,शरणी रेम्मव्वा,शरणी रेमम्मा,
शरणी रेचव्वे,शरणी कामम्मा,कोंडे मंचणाची पुण्यस्त्री शरणी लक्ष्मम्मा,शरणी केतलदेवी,शरणी गोग्गवे,शरणी विरम्मा,शरणी दुग्गुळे,शरणी गुड्डव्वा,शरणी काळव्वा,शरणी बोंतादेवी,शरणी मुक्तायक्का,शरणी मोळगी महादेवी, सत्यका,रायसद मंचण्णाची पुण्यस्त्री शरणी रायम्मा,रेवणसिद्धयाची पुण्यस्त्री शरणी रेकम्मा,सिद्धबुद्धाची पुण्यस्त्री शरणी काळव्वा,शरणी सुळे संकव्वे,
हडपण अप्पण्णाची पुण्यस्त्री लिंगम्मा,हादर कायकाच्या मारय्याची पुण्यस्त्री गंगम्मा, अशा अनेक ज्ञात-अज्ञात शरणींनी अनुभव मंटपात आपल्या दैदिप्यमान विचार देऊन अनुभव मंटप उजाळून टाकले आहे.
विश्वगुरु महात्मा बसवण्णा च्या क्रांतिकारी विचारांच्या प्रेरणेमुळे हे शक्य झाले.
🔯🌷 लिंगायत धर्म संकल्पिका माता अक्क नागाई
महात्मा बसवण्णांनी समतेची पहिली दिक्षा माता अक्क नागाई यांना दिली.
माता नागाई या बसवनिर्मीतीच्या निर्मितकार आहेत.महात्मा बसवण्णांनी आपल्या वैचारिक स्वातंत्र्याची सुरवात आपल्या घरातून केली.माता नागाई या अनुभव मंटपातील शरण-शरणी च्या मार्गदर्शन म्हणून कार्य करायच्या.त्यांनी स्वताः महात्मा बसवण्णाच्या विचारांच्या पाईक होत्या.त्यांनी अनेक वचने लिहिली व महत्त्वाचे म्हणजे कल्याणक्रांतीत आपले प्राण पणाला लावून वचनसाहित्याचे रक्षण केले.
शतकानूशतके धार्मिक फाश्यात अडकणा-या स्त्रियांना महात्मा बसवण्णांनी मुक्त केले हे त्या आपल्या वचनात सांगताना म्हणतात,
“माझे कुलसुतक नष्ट केले बसवण्णांनी.
माझे छलसुतक नष्ट केले बसवण्णांनी
माझे तनुसूतक नष्ट केले बसवण्णांनी.
माझे भावसूतक नष्ट केले बसवण्णांनी.
भेदा पासून मुक्त केले बसवण्णांनी.
अशा प्रकारे महात्मा बसवण्णांनी केलेल्या क्रांतीचा गौरव करतात.
🔯🌷 ज्ञानगंगोत्री अक्क महादेवी
स्त्रीला शतकानूशतके माया,राक्षसी,शुद्र,अपवित्र,पापिणी समजणा-या युगात महात्मा बसवण्णांनी “स्त्री प्रत्यक्ष महादेवी” म्हणून स्त्री वरील सर्व धार्मिक सामाजिक बंधने तोडून स्त्री-पुरुष समानतेचा जयघोष केला व अनुभव मंटपात ज्या अनेक तेजस्वी शरणी तयार झाल्या त्यातील एक म्हणजे “अक्क महादेवी”
अक्क महादेवींनी धार्मिक,राजकीय,आर्थिक,वैज्ञानिक, विषयावर आपले दैदिप्यमान विचार वचनातून मांडले आहेत.
महात्मा बसवण्णांनी जो आत्मविश्वास निर्माण केला त्याची प्रचिती त्या आपल्या वचनातून देताना म्हणतात,
“शुरपणाच्या गोष्टी केल्यास,
मी केव्हाचीच सज्ज विरवेषात.
सुगंध लेपून,लावून टिळा भाळावर,
शस्त्र परजवीत रणी उतरल्यावर,
बांधलेल्या नि-या सुटल्या तर –
तुमची आण पहा चेन्नमल्लिकार्जूना.
अशा प्रकारे स्त्रियांतील शक्तीची अस्मिता जागवून त्यांना धैर्याचे,सामर्थ्याचे दर्शन महात्मा बसवण्णांनी करवून स्वाभिमान,पराक्रमी जीवन जगण्याचे सामर्थ दिले.
🌷🌷 विधवा पुनर्वसन 🌷🌷
तत्कालीन काळात बालविवाह,जटरविवाह यामुळे व अपघाताने अनेक स्त्रिया या विधवा होत.या विधवांना सती जावे लागे,केशवपन करावे लागे अशी अत्यंत हिन प्रकारे वागणूक दिली जात.कोणत्याही मंगल कार्यात,धार्मिक कार्यात,पुज्यापाठात त्यांची उपस्थिती अशुभ मानली जात असे. अशा स्त्रियांना महात्मा बसवण्णांनी समाजपरिवर्तन करून क्रांतिकारी विचार मांडून विधवा पुनर्वसन करण्यासाठी समाजप्रबोधन केले.
विधवांनी पुनर्विवाह करावा,याचा स्विकार क्रांतिकारी बसवण्णा नी करून समाजपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.विशेषतः लिंगायत विधवा महिलांना केशवपन,सती या सनातनी विचारा पासून परावृत्त करण्याचे कार्य केले.
आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करून तत्कालीन समाजातील दरी कमी करण्याचे समतावादी कार्य बसवण्णा नी केले.✨
🌺🌺 वेश्याचे पुनर्वसन करणारे क्रांतीपुरुष 🌺🌺
“दासीपुत्र असो,वा वेषापुत्र असो,
लिंगदिक्षा झाल्यावर साक्षात शिव मानून,पुजून,
तयांचे पादोदक,प्रसाद स्वीकारनेच योग्य.
असे न करता,तिरस्कार करणाऱ्यांस
पंचमहापातक नरक पहा हो,कूडलसंगमदेवा.
या वनातूनच महात्मा बसवण्णा चे सकल जिवाचे कल्याण करणारे धैर्य दिसून येते.समाजातील सर्व स्थरावरील स्त्रियांची वेदना जाणून
कौटुंबिक,प्रतिकूल परिस्थिती आर्थीक हालाकिची परिस्थिती मुळे झालेल्या वेश्या व धार्मिक गुलामगिरीमुळे नाइलाजाने झालेल्या देवदासी या तत्कालीन नरभक्षाच्या बळी पडत असत.अशा सर्व निराधार महिलांचे पुनर्जिवन महात्मा बसवण्णा नी करुन ते तेथेच थांबले नाहित तर त्यांना जनसामान्यात आणुन त्यांना कायकाच्या माध्यमातून सामाजिक प्रतिष्ठा वाढवीण्याचे कार्य बसवण्णा नी केले.तसेच त्यांच्या भावना व अनुभव यांना वाट करुन देण्यासाठी अनुभव मंटपात स्थान दिले.त्यातील कित्येक स्त्रियांनी वचने लिहून क्रांती केली.
त्यापैकी शरणी संकव्वा ही एक.
अशा प्रकारे जागतिक स्तरावर महिलांना सर्वाधिकार देऊन,स्त्रियांना मानसिक धैर्य देऊन,त्यांच्यात स्वाभीमान निर्माण करून,त्यांच्या हृदयातील हुंकार ओळखणारे व त्यांचे सबलिकरण करणारे महात्मा बसवण्णा हे विश्वातील पहिले महामानव
म्हणुन स्त्री मुक्तीचे आद्य प्रणेते म्हणुन जगात महात्मा बसवण्णा चा गौरव होतो.
💥💥💥💥💥💢💢💢💢
——
सुनिल समाने, धानोरी, पुणे-१५.
मो.नंबर – ९४०४८३२१८१
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज