टीम मंगळवेढा टाईम्स । पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या माय-लेकरांना मालवाहतूक ट्रकने जोरात धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला , तर मुलगा गंभीर जखमी असून वेळापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माधुरी नवनाथ देशमुख (वय ३५ , रा . विखळे , जि.सातारा) असे अपघातात जागीच मरण पावलेल्या महिलेचे नाव असून शुक्रवारी पहाटे साडेसहा वाजता बोंडले ( ता . माळशिरस ) येथे हा अपघात झाला.
याबाबत प्रल्हाद देवराव जाधव यांनी वेळापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माधुरी या स्वत : च्या दोन मुलांसह काही दिवसांपूर्वी माहेरी बोंडले येथे धनाजी लक्ष्मण जाधव यांच्याकडे आल्या होत्या. शुक्रवारी पहाटे त्या मुलगा श्रीजय नवनाथ देशमुख ( वय ११ ) याला सोबत घेऊन मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या.
त्या पुणे – पंढरपूर पालखी मार्गावर माय लेकरू वेळापूरच्या दिशेने घराकडे जात असतानाच ट्रकने धडक दिली. A woman who went for a morning walk was hit by a truck and died
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज