mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

द बर्निंग कारचा थरार! मंगळवेढ्यात धावत्या कारने घेतला अचानक पेट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 21, 2022
in मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढयात धावत्या कारला शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून कारचे नुकसान झाले असून सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. सदर घटनेबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अलीकडे धावत्या वाहनांना आग लागण्याचे प्रकार वाढू लागले असून राज्य परिवहन महामंडळाच्या बस, ट्रक आणि कार यांना आग लागून आगीत ही वाहने जळून खाक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

त्यात सद्या कडक उन्हाळा असून सोलापूरचे तापमान तर ४३ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.

सोलापूर येथून सांगोला तालुक्यात निघालेल्या एक विद्यार्थ्याच्या गाडीला मंगळवेढा हद्दीत अचानक आग लागल्याची घटना समोर आली असून या घटनेची नोंद मंगळवेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सांगोला तालुक्यातील घेरडी येथील ऋषिकेश रामहरी लवटे हा २२ वर्षाचा तरुण सोलापूरकडून आपल्या गावी निघाला होता एम एच ०८ झेड ८३०० ही रेनॉल्ट डस्टर ही गाडी स्वतः चालवत होता. त्याच्यासोबत गाडीत अन्य कुणीही नव्हते.

मंगळवेढ्यातुन पाठखळ मार्गाने तो घेरडीकडे निघाला असताना काशीद मळ्याजवळ ही घटना घडली . गाडीच्या इंजिनमधून वायरिंग जळाल्यासारखा वास येऊ लागल्यामुळे ऋषिकेशने गाडी रस्त्याच्या बाजूला घेत थांबवली.

बॉनेट उघडून पहिले असता इंजिनमधून जाळ येऊ लागल्याचे दिसले . गाडी पेटली असल्याचे दिसताच ते गाडीपासून दूर गेले आणि काही क्षणात ही आग भडकली . आजूबाजूचे लोक देखील यावेळी जमा झाले.

अग्निशामक दलाशी संपर्क साधून गाडीला लागलेली आग विझविण्यात आली . वेळीच दक्षता घेतल्यामुळे या घटनेत जीवितहानी झाली नाही परंतु गाडीचे चार लाख रुपयांचे नुकसान मात्र झाले आहे .

धावत्या गाडीत शॉर्टसर्किट झाल्यामुळेच गाडीला आग लागली असल्याचे ऋषिकेश लवटे यांनी म्हटले आहे . सदर घटनेबाबत मंगळवेढा पोलिसात फिर्याद देण्यात आली असून सहाय्यक पोलीस फौजदार निंबाळे हे अधिक तपास करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अचानक पेट कार

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

टवाळखोरांनो सावधान! मंगळवेढ्यात ‘निर्भया पथक’ फिरतेय; शाळा आणि बाजारपेठेत कडक गस्त

April 15, 2026
धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

April 15, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
Next Post
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

'विठ्ठल' व 'दामाजी'ची प्रारूप मतदार यादी जाहीर; हरकतींसाठी 'या' तारखेपर्यंत मुदत

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

April 16, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 16, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 16, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 16, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

टवाळखोरांनो सावधान! मंगळवेढ्यात ‘निर्भया पथक’ फिरतेय; शाळा आणि बाजारपेठेत कडक गस्त

April 15, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा