mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आईला का मारहाण केली याचा जाब विचारत वडिलांना झाडाला बांधून केली मारहाण, वडिलांचा जागीच मृत्यू; मामा-भाच्यास अटक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 16, 2022
in क्राईम, सोलापूर
Breaking! पाठीमागून येणाऱ्या कारने पिकअप गाडीला उडवले, मंगळवेढ्यातील एकाचा मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

घरातील वाद किती विकोपाला जाऊ शकतात याची प्रचिती आणणारी धक्कादायक घटना सोलापुरात घडली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे घरगुती भांडणाच्या रागातून स्वतःच्या वडिलांची हत्या एका मुलाने केलीय.

विशेष म्हणजे मुलाचा मामा देखील या हत्येत सहभागी होता. मंद्रुप पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपी मुलगा तानाजी थोरात आणि त्याचा मामा भीमराव जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केलीय.

13 ऑगस्ट रोजी मयत शिवाजी थोरात याने आपल्या पत्नीस मारहाण केली होती. यांसदर्भात जेव्हा मृत व्यक्तीचा मुलगा तानाजी याला माहिती समजली त्याने घरी जाऊन पाहणी केली. तेव्हा आई रक्तबंबाळ असल्याचे त्याच्या लक्षात आले. तेव्हा आईला रुग्णालयात भरती करण्यासाठी तो तात्काळ रुग्णालयच्या दिशेने गेला. वाटेत भाऊ भेटल्याने आईला भावाला रुग्णालयात घेऊन जायला सांगून तो रागाच्याभरात घराकडे परतला.

आईला मारहाण का केली याचा जाब विचारत तानाजीने मामा भीमराव याच्या मदतीने वडिलांना मारहाण करण्यास सुरु केलं. राग इतका टोकाला गेला की तानाजीने वडिलांना नारळाच्या झाडाला बांधून लाकडी वाशाने मारहाण करण्यास सुरुवात केली.

यामध्ये मृताच्या शरीरातील बरगड्या तुटल्या होत्या. झालेल्या या मारहाणीत शिवाजी थोरात यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकारानंतर आपल्यावर कारवाई होऊ नये यासाठी आरोपींनी अपघात झाल्याचा बनाव देखील केला. आईला मारहाण केल्यानंतर गाडीवर जात असताना वडील शिवाजी थोरात पडले यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. अशी तक्रार आरोपीने स्वतःच पोलिसात दिली.

सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन पोलिसांनी संशय बळावल्याने कसून तपास केला. परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली. मोटारसायकलचे निरीक्षण केले. तेव्हा मृत शिवाजी यांनी पत्नीला केलेली मारहाणीची घटना पोलिसांच्या कानावर आली.

तेव्हा पोलिसांनी आरोपी मुलगा तानाजीला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरु केली. यावेळी आरोपी तानाजीने घडलेल्या घटनेची संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली.

नारळाच्या झाडाला बांधून मामाच्या मदतीने वडिलांना संपविले

मृत शिवाजी थोरात हे आपल्या पत्नीपासून विभक्त राहत होते. पती-पत्नीत नेहमी वाद होत होते.13 ऑगस्ट रोजी शिवाजी थोरात घरी आले आणि कौटुंबिक वादातून पत्नीस मारहाण करू लागले. वाद विकोपास जाऊन शिवाजी थोरात यांनी पत्नीच्या पाठीवर कुऱ्हाडीने घाव घातला.

जखमी आईस मुलगा तानाजीने रुग्णालयात उपचार करून वडिलांना शोधून आणले. त्यानंतर नारळाच्या झाडाला बांधून मामा भीमराव जाधव याच्यासह मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत शिवाजी थोरात गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीरातील बरगड्या देखील तुटल्या होत्या.

आरोपी मामा-भाच्यास पोलीस कोठडी

अकस्मात मृत्यू बाबत तपास करत असताना वेगळीच माहिती समोर आल्याने पोलीस उपनिरीक्षक करपे यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

भदंवि कलम 302, 177, 34, 342, 504 अन्वये गुन्हा नोंद केला. तसेच आरोपी मुलगा तानाजी थोरात आणि आरोपी भीमराव थोरात या दोघा मामा-भाच्यास अटक केले.

आरोपींना न्यायलयात हजर केले असता 18 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केलीअसल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी दिली आहे.(स्रोत:ABP माझा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मारहाण

संबंधित बातम्या

खळबळ! हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात डल्ला मारणारा मंगळवेढ्याचा व्यावसायिक गजाआड; सव्वाआठ लाखांचे दागिने जप्त

February 13, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

बापरे..! जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी इच्छुक झाले कर्जबाजारी; सावकाराचे कर्ज डोक्यावर : निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च

February 13, 2026
लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळजनक! खोटा व न वटणारा चेक दिल्याप्रकरणी आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावास

February 9, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

कामाची बातमी! मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी बॅलेट पेपरवर दोन रंगांची रचना; जि. प. गटांचे उमेदवार पांढऱ्या, तर पं. स. गणांचे गुलाबी रंगात

February 7, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा; 4 लाख 57 हजाराचा मुद्देमाल जप्त केला; अवैध धंद्याची माहिती स्थानिक पोलीसांना कशी काय होत नाही?

January 25, 2026
Next Post
मेरी शान तिरंगा! हर घर झेंडा उपक्रमांतर्गत मंगळवेढा शहरासह तालुक्यात ‘एवढ्या’ हजार प्रत्येक घर, कार्यालय, दुकानावर तिरंगा फडकणार

मंगळवेढेकरांनो! एक मिनिटांसाठी जागेवरच थांबा; आज शहर व ग्रामीण भागात होणार सामुहिक राष्ट्रगीत गायन

ताज्या बातम्या

हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

February 14, 2026

खळबळ! हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात डल्ला मारणारा मंगळवेढ्याचा व्यावसायिक गजाआड; सव्वाआठ लाखांचे दागिने जप्त

February 13, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार 6000 हजार रुपये; ‘या’ दिवशी होणार जमा

February 13, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

बापरे..! जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी इच्छुक झाले कर्जबाजारी; सावकाराचे कर्ज डोक्यावर : निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च

February 13, 2026

पालकांनो, खिशाला कात्री लागणार नाही! सरकारने ‘या’ विद्यार्थ्यांची परीक्षा फी केली माफ; पहा तुम्ही पात्र आहात का?” जाणून घ्या…

February 13, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुपाऱ्या दिल्या जातायत; मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप, म्हणाले….

February 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा