mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! आईचा गळा आवळला, बापाला चाकूने मारलं; पोटच्या लेकानं असं का केलं? कारण ऐकून सर्वच हादरले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 2, 2025
in क्राईम, राज्य
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

मुलानेच आपल्या आई वडीलांचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे दुहेरी हत्याकांड समोर आले. त्यामुळे नागपूरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या करणारा मुलगा हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे.

तर त्याची आई शिक्षिका तर वडील कंपनीत चांगल्यापदावर कामाला होते. विशेष म्हणजे खून केल्यानंतर या दोघांचेही मृतदेह पाच दिवस त्यांच्या घरात पडून होते. ज्या वेळी पोलिसांनी या प्रकरणी मुलाला अटक केली त्यावेळी हत्ये मागचे कारण ऐकून पोलिसही हादरून गेले. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली.

उत्कर्ष लीलाधर डाखोळे हा आपल्या आई वडील आणि बहीणीसह नागपूरच्या कपिलनगर परिसरात राहतो. आई अरुणा डाखोळे या शिक्षिका होत्या. तर वडील लिलाधर डाखोळे हे खाजगी कंपनीत कामाला होते. उत्कर्ष हा इंजिनिअरिंग करत होता. तर बहीण कॉलेजला होती.

26 डिसेंबरला दुपारी त्याची आई अरूणा या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका घरी तपासत होत्या. त्याच वेळी उत्कर्ष तिथे आला. त्याने संधी साधत आईचा गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर तो बराच वेळ त्यांच्या मृतदेहा जवळ बसून होता. तो आता वडीलांची वाट पहात बसला होता.

संध्याकाळी त्याचे वडील लीलाधर हे घरी आले. घरी आल्यानंतर समोर पत्नीचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. ते तसेच खाली सोफ्यावर बसले. त्याच वेळी उत्कर्षने कसलाही विचार न करता वडीलांच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यातच त्यांचाही मृत्यू झाला.

दोघांनाही मारल्यानंतर उत्कर्षने त्यांचे मोबाईल आपल्या ताब्यात घेतले. घराला लॉक लावत तो त्याच्या काकांकडे निघून गेला. बहीणीलाही कॉलेजमधून सोबत घेतले. आई बाबा बंगळुरूला अध्यात्माच्या कार्यक्रमाला गेले आहेत. ते पाच दिवसांनी येणार आहेत असं त्यांने सांगितलं.

त्याने असं सांगितल्यामुळे कुणालाही त्यांच्यावर संशय आला नाही. बहीण त्याला सतत आई वडीलांबद्दल विचारत होती. पण त्यांना तिकडे फोन वापरण्यास बंदी आहे असं तो तिला सांगत होता. पाच दिवसानंतर म्हणजेच नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्कर्षच्या घरा शेजारी राहणाऱ्या लोकांना त्याच्या घरातून दुर्गंधी येवू लागली.

शिवाय काही जण शुभेच्छा देण्यासाठी ही आले होते. त्यांनाही तोच अनुभव आला. घर बंद होते. अशा स्थितीत त्यांनी पोलिसांना ही माहिती कळवली. पोलिसही घटनास्थळी ताबडतोब पोहोतले. त्यांनी दरवाजा उघडल्यावर त्यांना डाखोळे दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

पोलिसांनी याबाबत चौकशीसाठी उत्कर्षला बोलावलं. त्याची चौकशी करत असताना त्याने गुन्हा कबुल केला. आपणच आपल्या आई वडीलांचा खून केल्याचे त्याने मान्य केले. पण खून का केला? या मागचे कारण ऐकून पोलिस हादरून गेले. उत्कर्ष हा इंजिनिअरिंग करत होता. गेल्या सहा वर्षापासून तो शिकत होता. काही विषयात तो नापास झाला होता. त्यामुळे त्याचे आई वडीस त्याला इंजिनिअरिंग सोड आणि आयटीआय कर असं सांगत होते. शिवाय गावाला जावून शेती कर असा सल्लाही त्याला देत होते.

गावाला जाण्यासाठी त्याची बॅगही भरली गेली होती. आई वडीलांचे सततचे टोमणे त्याला त्रासदायक वाटत होते. तर एक दिवस वडीलांनी त्याच्यावर हातही उचलला होता. हे त्याला अपमानजनक वाटत होते. त्याच बरोबर गावाला गेलो तर नागपूर सुटेल. मित्रमैत्रिणी सुटतील याची भिती त्याला होती. तसं होता कामा नये यासाठी त्याने आई वडीलांनाच संपवण्याचा निर्णय घेतला. आपल्या जबाबात त्यांने याची कबुली दिली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आई वडीलखून

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

वडिलांना घराचा ताबा देऊन मुलांनी घर रिकामे करावे, वडिलोपार्जित जमिनीत उत्पन्नापैकी ५० टक्के वार्षिक हिस्सा वडिलांना द्या; आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

November 13, 2025
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

लग्नाळू! माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवू द्या, तुमचे उपकार विसरणार नाही; अस्वस्थ सिंगल तरुणाचं ‘या’ बड्या नेत्याला पत्र

November 13, 2025
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळ! प्रलंबित खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी 15 लाख मागितले, सत्र न्यायाधीशावर गुन्हा दाखल; लाचलुचपत विभागाची कारवाई

November 13, 2025
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मोठी बातमी! मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय ‘या’ व्यक्तीला अटक

November 12, 2025
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.आवताडेंनी मोठा डाव टाकला; उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंताला गळाला लावले, भाजपची ताकद वाढली

November 12, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! कृषी विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य बदलले; पूर्वी ‘शेतकऱ्यांच्या सेवार्थ’ तर आता ‘ही’ अशी असणार टॅगलाईन

November 10, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या पतीचा मेव्हण्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील घटनेने खळबळ

November 10, 2025
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

धक्कादायक! कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, समुद्रात शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; पालकांनी मुलांची काळजी घ्यावी; नेमकं काय घडलं?

November 9, 2025
नाद करती काय..! भाजप जिल्हाध्यक्षांना कार्यकर्त्यांनी दिली आलिशान फोर्च्यूनर गिफ्ट; चव्हाण यांना विधानपरिषदेवर घेण्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी; राज्यभर होतेय चर्चा

नाद करती काय..! भाजप जिल्हाध्यक्षांना कार्यकर्त्यांनी दिली आलिशान फोर्च्यूनर गिफ्ट; चव्हाण यांना विधानपरिषदेवर घेण्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी; राज्यभर होतेय चर्चा

November 8, 2025
Next Post
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

नववर्षातील पहिला धक्का! जानेवारीपासून 'ही' तीन प्रकारची बँक खाती बंद होणार; आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर

ताज्या बातम्या

मोठी संधी! सोलापूर व मंगळवेढ्यात नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी; 12 वी ते पदवीधर मुली व मुलांसाठी फिक्स पगार, आकर्षक कमिशन; 8090100191 करा संपर्क; आजच करा अर्ज

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘शांतीसागर इंण्डेन गॅस एजन्सी’मध्ये नोकरीची संधी, थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार; गॅस असणाऱ्यांनी केवायसी करा, अन्यथा सबसिडी मिळणार नाही; ‘ही’ आहे शेवटची तारीख

November 13, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

वडिलांना घराचा ताबा देऊन मुलांनी घर रिकामे करावे, वडिलोपार्जित जमिनीत उत्पन्नापैकी ५० टक्के वार्षिक हिस्सा वडिलांना द्या; आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

November 13, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

भाजपच्या प्रतिष्ठेची तर घड्याळ, धनुष्यबाण, काँग्रेस, तुतारी, ठाकरे सेनेच्या अस्तित्वाची लढाई; आ.आवताडेंना रोखण्यासाठी अखेर ‘समविचारी’ची स्थापना; जगताप वेट & वॉच?

November 13, 2025
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

लग्नाळू! माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवू द्या, तुमचे उपकार विसरणार नाही; अस्वस्थ सिंगल तरुणाचं ‘या’ बड्या नेत्याला पत्र

November 13, 2025
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळ! प्रलंबित खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी 15 लाख मागितले, सत्र न्यायाधीशावर गुन्हा दाखल; लाचलुचपत विभागाची कारवाई

November 13, 2025
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मोठी बातमी! मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय ‘या’ व्यक्तीला अटक

November 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा