मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बंडगरवाडी येथे मोडी लिपी शिकवण्याचा एक दुर्मिळ आणि कौतुकास्पद शैक्षणिक प्रयोग राबवला जात आहे. या उपक्रमाची संकल्पना शाळेतील सहशिक्षक महादेव क्षीरसागर यांची असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग यशस्वीपणे सुरू आहे.
महादेव क्षीरसागर हे नेहमीच नावीन्यपूर्ण आणि वेगळ्या शैक्षणिक संकल्पना राबवून विद्यार्थ्यांना दर्जेदार व संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ आधुनिक शिक्षणच नव्हे तर आपल्या समृद्ध इतिहासाची व संस्कृतीची ओळखही होत आहे.

मोडी लिपी ही मराठी भाषेचा आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा एक महत्त्वाचा ठेवा असून, इतिहास, प्रशासन व साहित्याच्या अभ्यासासाठी तिचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे.
लहान वयातच विद्यार्थ्यांना मोडी लिपीचे धडे मिळाल्याने त्यांच्यात इतिहासाविषयी आवड निर्माण होत असून सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याची जाणीव विकसित होत आहे.

या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात असून, इतर शाळांनीही अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नंदेश्वर येथील हा उपक्रम निश्चितच इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चांगल्या प्रकारे चालना मिळेल
अलिकडच्या काळातील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता पाहता त्यांना नियमित अभ्यासाबरोबर वेगवेगळ्या संकल्पना राबवून अध्यापन करणे गरजेचे आहे. यातून मी माझ्या शाळेत मोडी लिपी तर शिकवित आहेच.

याबरोबर बुद्धिबळ, अबॅकस अशा प्रकारच्या अनेक संकल्पना राबवित आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चांगल्या प्रकारे चालना मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या नियमित अभ्यासाबरोबर राबविलेल्या वेगवेगळ्या संकल्पनांना विद्यार्थ्यांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे.- महादेव क्षीरसागर, सहशिक्षक, जि.प. शाळा, बंडगरवाडी

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











