मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क .
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजितदादा हे राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवनाकडे निघाले आहेत.
आधीच कार्यक्रम रद्द
तुम्ही नगरचा कार्यक्रम रद्द का केला? अजित पवार यांच्या नाराजीनाट्यामुळे कार्यक्रम रद्द केला का? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नगरचा कार्यक्रम आधीच रद्द झालेला असल्याचं स्पष्ट केलं. गेल्याच आठवड्यात नगरचा कार्यक्रम रद्द झाला होता. आता सुप्रिया सुळेही मुंबईवरून पुण्याला यायला निघाल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
6 जुलै रोजी बैठक
अजितदादांनी संघटनेच्या जबाबदारीची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर चर्चा करण्यासाठी मी एक बैठक बोलावली आहे. येत्या 6 जुलै रोजी ही बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. संघटनेत पुनर्रचना करण्याची गरज आहे काय? महिला, युवक आणि अल्पसंख्यांकांच्या संघटनेत काही बदल करायचे का? यावर चर्चा होईल. तसेच युथ राष्ट्रवादीत वयाचं बंधन आहे. तरीही काही लोक वय ओलांडल्यानंतरही काम करत असतात. त्यामुळे त्यावर निर्णय घेतला पाहिजे अशी सूचना अजित पवार यांनी केली होती. त्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केल.
म्हणून दिल्लीत गेले
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमचे कार्यकर्ते अशोक पवार यांच्या घरातील लग्न दिल्लीत होतं. त्यामुळे मी, अजित पवार, जयंत पाटीलही दिल्लीत गेलो होतो. याच चार दिवसातील ही गोष्ट आहे, असा खुलासा त्यांनी केला.
एकटा निर्णय घेत नाही
आजच्या बैठकीत काय होईल ते मला कळवलं जाईल. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाबाबतची चर्चा 6 तारखेच्या बैठकीत पूर्ण होईल. अजित पवार संघटनेत काम करण्यास इच्छुक आहेत, हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं. संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण असे निर्णय एक व्यक्ती ठरवत नाही. पक्षात सर्व बसून निर्णय ठरवत असतात. अध्यक्ष निवडण्याचा निर्णय मी एकटा घेत नाही. सर्वांना विचारून निर्णय घेत असतो, असं त्यांनी स्पष्ट केलं

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज