टीम मंगळवेढा टाईम्स ।
मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कवठेमहांकाळ पोलिसांना यश आले असून, या टोळीतल्या सहा जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 22 लाख रुपये किंमतीची तीन मांडूळे जप्त करण्यात आली आहेत.
गजानन वसंत सरगर (वय 22), संजय अशोक ओलेकर (वय 31), तिप्पान्ना म्हाळाप्पा पडवळे (वय 33, सर्व रा. सलगरे खुर्द, ता मंगळवेढा),महादेव मनोहर बेनाडे (वय 49), विवेक राजेंद्र बेनाडे (वय 28, दोघेही रा. डोनेवाडी, ता.निपाणी, जि.बेळगाव) आणि युवराज दत्तात्रय मगदूम (वय 42, रा. इचलकरंजी) अशी संशयितांची नावे आहेत.
खोटी माहिती देऊन लोकांची फसवणूक करून अवैधरित्या दुर्मिळ मांडूळ जातीचे साप विकरणारी टोळी पोलिसांनी पकडली. सापाची विनापरवाना विक्री केल्याबद्दल पोलिसांनी वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
धन-दौलत व ऐश्वर्य मिळेल अशी बतावणी करून या मांडूळ सापाची विक्री या टोळीकडून करण्यात येत होती. मात्र पोलिसांना याची वेळीच माहिती मिळाली आणि छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई केली.
त्यांची अंदाजे किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे. मांडूळ विक्री करणारी टोळी मेघराज मंदिराजवळ येणार असल्याची माहिती पोलीस नाईक आमीरशा फकीर यांना मिळाली.
त्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर, शिवाजी करे, पोलीस हवालदार दीपक गायकवाड, संजय चव्हाण, आण्णासो भोसले, चंद्रसिंग साबळे, प्रशांत मोहिते, वनपाल अधिकारी आर. आर. चौगुले, वनरक्षक अधिकारी डी. एस.बजबळकर यांनी सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले.
गजानन वसंत सरगर, संजय अशोक ओलेकर, तीप्पाण्णा म्हाळाप्पा तडवळे (सर्व सलगरे खुर्द, जि. सोलापूर), महादेव मनोहर बेनाडे, युवराज दत्तात्रय मगदूम (इचलकरंजी, जि. कोल्हापूर) तर वाहन चालक विवेक राजेंद्र बेनाडे (डोणेवाडी, जि. बेळगाव) यांच्या ताब्यातील वायरच्या पिशवीतून तीन दुर्मिळ साप (मांडूळ) विनापरवाना बाळगल्याने ताब्यात घेतले. या सहा जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी करे तपास करीत आहेत.
या सापांमुळे धन-दौलत मिळते अशी बतावणी करून लोकांची फसवणूक करत विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कवठेमहांकाळ येथील मेघराज मंदीर याठिकाणी सापळा रचून साप विक्रीसाठी आलेल्या सहा जणांच्या टोळीला अटक करत त्यांच्या ताब्यातील दुर्मिळ मांडूळ जातीचे साप केले.
तर सहा जणांच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये वन कायद्या अंतर्गत अवैधरित्या साप बाळगणे व तसेच लोकांची फसवणूक करण्याचा उद्देश असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज