टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र विधानसभेची आचारसंहिता लागायला काही तास बाकी असताना महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न निकाली काढलेला आहे.
महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रसने आपल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले आहे.
त्यानुसार भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधिमंडळात जातील.
महाराष्ट्र विधानसभेची घोषणा उद्या परवाच्या दिवसांत कधीही होऊ शकते. आचारसंहिता लागल्यावर सरकारला कोणताही निर्णय घोषणा करता येत नाही किंबहुना घोषणा करता येत नाही.
त्यामुळे आचारसंहितेच्या काही तासांआधी राज्यपाल नियुक्ती आमदारांचा रखडलेला विषय महायुतीने मार्गी लावल्याचे बोलले जाते.
भारतीय जनता पक्षात गेली पाच वर्षे उत्तम काम करणाऱ्या महिला नेत्या चित्रा वाघ यांची शिफारस राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून करण्यात आलेली आहे.
तसेच विक्रांत पाटील आणि महायुतीतील बदलेल्या समीकरणांमुळे मुखेडचे आमदार तुषार राठोड यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर जाण्यासाठी भाजपने शिफारस केलेली आहे.
दुसरीकडे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंना सोडून शिंदे गटात लगोलग प्रवेश केलेल्या मनीषा कायंदे यांच्या नावाचा विचार मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेला दिसतो. मनीषा कायंदे यांच्या विधान परिषदेच्या कार्यकाळ संपलेला होता.
पक्ष संघटनेत काम करणाऱ्या महिला नेतृत्वाला संधी दिल्याचे विधानसभा निवडणूक प्रचारात सांगता येईल, किंबहुना त्यांचे राजकीय पुनर्वसन देखील करायचे होते, त्यामुळे शिंदे यांनी कायंदेंना संधी दिल्याचे सांगण्यात येते.
तसेच लोकसभेला हेमंत पाटील यांना डावलल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे एकनाथ शिंदे यांना गरजेचे बनले होते. त्यामुळे त्यांनाही विधान परिषदेवर पाठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतल्याचे सांगितले जाते.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक विभागाचा चेहरा म्हणून इद्रिस नाईकवाडी यांना पक्षाने संधी दिली आहे.
राज्यपाल कोट्यातून ‘यांना’ संधी!
राष्ट्रवादी अजित पवार गट-पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी
शिवसेना- मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील
भाजप -चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि मुखेडचे विद्यमान आमदार तुषार राठोड
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज