टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी येथे एका ४५ शेतकरी बोअरवरची वर्षीय इलेक्ट्रिक मोटर चालू करण्यास गेल्यावर पेटीचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेची नोंद अकस्मात मृत अशी पोलिसांत झाली आहे. दरम्यान, संतोष वामन गवळी असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी संतोष गवळी हे दुपारी अडीच वाजता भालेवाडी येथील त्यांच्या शेतातील बोअरची मोटार चालू करण्यासाठी
इलेक्ट्रिक खांबाला बसवलेल्या पेटीतील स्टार्टर चालू करताना स्टार्टरचा शॉक लागल्याने त्यांचा औषध झाला उपचारांपूर्वीच मृत्यू असल्याची खबर गणेश गवळी यांनी दिली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पेटीत विद्युत्प्रवाह उतरण्याची दाट शक्यता असते.
तरी शेतकऱ्यांनी आपल्या पेटीला विद्युत करंट आला नसल्याची खात्री करूनच पेटीला हात लावावेत, असे आवाहन वीज वितरणकडून करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार महेश कोळी हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज