टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठीशाळांमध्ये इंग्रजी माध्यमातील डीएड् धारकांना नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.
त्यामुळे याविरोधात मराठीतून डीएड् झालेल्यांतून संताप व्यक्त होत आहे. हा शासन निर्णय रद्द करून माध्यमानुसार विशेष सवलत न देता अभियोग्यता चाचणीतील गुणांनुसार भरती करावी, अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे.
राज्यभरात 30 हजार शिक्षकांची भरती करण्याचा विचार शासनाचा आहे. याबाबतच्या घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.
शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी अभियोग्यता चाचणी (भरती परीक्षा) फेबु्रवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आली. त्यातील शिक्षकांच्या नेमणुका देण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू झाल्या आहेत.
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह बिगर इंग्रजी माध्यमाच्या सेमी इंग्रजी शाळांवर इंग्रजी माध्यमातून डीएड् धारकांना नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणशास्त्र पदविका असणार्या मुलांना विशेष सवलत दिली जाणार असल्याचे पत्रकसुद्धा काढण्यात आले. हा निर्णय म्हणजे मराठी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका प्राप्त मुलांवर मोठा अन्याय आहे,
हे पत्रक 2013 च्या शासन निणर्र्याचा संदर्भ घेऊन काढण्यात आलेले असून सुधारित 2018 च्या शासन निर्णयाकडे दुर्लक्ष केले गेले आहे. सुधारित 2018 च्या जीआरनुसार इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची आवश्यकता नाही. मराठी माध्यमाचा शिक्षकइंग्रजीमधून शिकवण्यास सक्षम आहे, असे त्यात स्पष्ट म्हटले आहे. असे असताना इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना ही विशेष सवलत देणे योग्य नाही.
मुळातच इंग्रजी माध्यमाच्या मुलांची संख्या मराठी माध्यमाच्या उमेदवारांच्या तुलनेत कमी आहे. न्यायालयाने नुकतेच इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना दिले जाणारे 20% आरक्षण रद्द ठरवले. तरीही इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणशास्त्र पदविकाप्राप्त शिक्षकांची सेमी इंग्रजी शाळांवर नियुक्ती करणे हा न्यायालयाचा अवमान नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. माध्यम वेगळे आहे म्हणून विशेष सवलत दिली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवले असतानाही त्याची पायमल्ली होत आहे.
इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना शिक्षक भरतीत पूर्ण मराठी, पूर्ण इंग्रजी, सेमी इंग्रजी या सर्वच ठिकाणी संधी उपलब्ध आहे. परंतु मराठी माध्यमाच्या उमेदवारांना फक्त एकाच ठिकाणी संधी आहे. 2017 च्या अभियोग्यता चाचणी परीक्षेचा निकाल पाहता अत्यंत कमी गुण असणारा इंग्रजी माध्यम असणारा उमेदवार शाळेवर नियुक्त झालेला आहे. परंतु तुलनेने जास्त गुण असणारा मराठी माध्यमाचा उमेदवार नोकरीपासून वंचित आहे.
महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर होणार हा अन्याय विचार करायला लावणारा आहे. शासनाने याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे आणि इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना दिली जाणारी विशेष सवलत थांबवून हे पत्रक रद्द करावे.- नीलेश पाटील, अभियोग्यताधारक
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज