टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील बोराळे नाका परिसरात एका गटारीत पुरुष जातीचा (अंदाजे 35 वय) मृतदेह आढळला आहे.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मृत इसमाचे नाव अद्याप स्पष्ट झाले नाही पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
ही घटना आज सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनिल दशरथ चव्हाण (खंडोबा गल्ली) हे घरातून कामावर जात असताना
त्यांना बोराळे नाका येथील नागोबा मंदिरा शेजारील गटारीमध्ये पालथ्या स्तिथीत अनोळखी इसमाचा हा मृतदेह आढळून आला, याची खबर पोलिसांना लगेच दिली.
गटारीच्या पाण्यात पडून मयत झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. गटारीमधून तो मृतदेह बाहेर काढून त्याची आजू बाजूस चौकशी केली पण तपास लागला नव्हता.
मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून हा मृतदेह कोणाचा आहे इथे कसा आला याचा तपास पोलीस करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज