टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा चोखामेळानगर ग्रामपंचायत हद्दीतील शांतीनगरमध्ये एका 65 वर्षीय महिलेच्या घरी येवून तुझा कोणता फिल्टर नीट करावयाचा आहे, दाखव, नीट करतो
असे म्हणून घरामध्ये येवून साडीचा पदर ओढून अंगास झोंबाझोंबी करून सदर महिलेच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी
सरपंच शिवाजी तुकाराम सलगर, सरपंच पत्नी आशा शिवाजी सलगर, ग्रामसेवक राजेंद्र बाळासाहेब गोरे रा.सांगोला या तिघाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, यातील पिडीता तथा फिर्यादी दि.13 रोजी सायंकाळी 4.30 वाजता शांतीनगरमधील घरात फिर्यादीचा मुलगा, सुन असे असताना
आरोपी तथा सरपंच शिवाजी सलगर, ग्रामसेवक राजेंद्र गोरे, सरपंच पत्नी आशा सलगर हे घरामध्ये येवून तू ग्रामसभेत खुप तक्रारी मांडत होती,
तुझा कोणता फिल्टर नीट करावयाचा आहे, दाखव असे म्हणून फिर्यादीस आरोपीनी हाताने लाथाबुक्याने मारहाण करून
साडीचा पदर ओढून अंगास झोंबाझोंबी करून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. याचा अधिक तपास शहर बिटचे पोलिस हवालदार रहिम पठाण हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज