टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील शिवणगी येथे ट्रॅक्टर घेवून शेत नांगण्यास शेतात गेलेल्या एका 30 वर्षीय विवाहीत महिलेच्या तोंडावर बोचकरुन अंगावरील गाऊन फाडून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्या प्रकरणी अर्जून शिवा केंगार याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी तथा पिडीत महिला ही दि.12 रोजी सायंकाळी 4 वाजता शेतात टॅ्रक्टरच्या सहाय्याने नांगर मारत असताना आरोपी अर्जुन केंगार याने येवून म्हणाला की,
तु या शेतात नांगर मारायचा नाही, तु ट्रॅक्टर घेवून का आली आहे? असे म्हणत तोंडावर बोचकरुन या शेतात तु परत यायचे नाही असे म्हणत
शिवीगाळी दमदाटी करीत अंगाला झोंबा झोंबी करुन अंगातील गाऊन फाडून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार हिप्परकर हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज