टीम मंगळवेढा टाईम्स।
कामावर असताना दोन कोटी ५४ लाख १८ हजार ४८८ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता संपादित केल्याप्रकरणी भीमा कालवा मंडळ सोलापूर वर्ग-१ चे तत्कालीन अधीक्षक व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध सदर बजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अॅन्टी करप्शन विभागाने ही कारवाई केली. राजकुमार जनार्दन कांबळे (वय ५९, रा. शाकुंतल निवास, कोणार्क नगर विजापूर रोड सोलापूर), • असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
सप्टेंबर १९८९ ते मार्च २०१८ दम्यान राजकुमार कांबळे यांनी भ्रष्ट मार्गाने त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे संपादित केलेली अपसंपदा आहे. लोकसेवक राजकुमार कांबळे यांनी भ्रष्ट मार्गाने त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे ज्ञात उत्पन्नाशी एकत्रित टक्केवारी काढली असता, ती ५७.१८ टक्के अपसंपदा होते.
कांबळे यांनी संपादित केलेली मालमत्ता ही अपसंपदा आहे, हे माहीत असतानाही त्यांच्या कुटुंबीयांनी सदर अपसंपदा स्वतःच्या कब्जात बाळगली.
राजकुमार कांबळे यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा व साहाय्य केले असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम १३ (१) (ई) सह १३ (२), तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन २०१८ चे कलम १३ (१) (ब) सह १३ (२) सह भादंवि कलम १०९ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पाच अधिकाऱ्यांनी केली चौकशी
अपसंपदाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन अधीक्षक अरुण देवकर, तत्कालीन प्रभारी पोलिस उपअधीक्षक जगदीश भोपळे, तत्कालीन उपअधीक्षक अजितकुमार जाधव, तत्कालीन उपाधीक्षक संजीव पाटील व विद्यमान पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी केली.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज