मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
लातूर येथील विकासनगर भागात एका शिक्षकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. पाच) उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रुद्दा (ता. अहमदपूर) येथील रामदास भगवान केंद्रे (वय 32) हे एका शाळेत शिक्षक आहेत.
ते येथील विकासनगर भागात राहत होते. बुधवारी सकाळी त्यांनी राहत्या घरी छताच्या फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नागनाथ केंद्रे यांच्या माहितीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज