मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकर्यांचा विश्वास संपादन करून शेतकर्यांकडून द्राक्षे खरेदी करून त्यांना पैसे न देताच दलालाने पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला. 45 ते 50 शेतकर्यांना दोन कोटींहून अधिक रकमेला गंडा घातला आहे. बाबाजान पठाण व त्याचा साथीदार दाऊद (रा. गव्हाण, ता. तासगाव, मूळ रा. अशोकनगर, अनंतपुरम् आंध्रप्रदेश) अशी संशयित दलालाची नावे आहेत.
याप्रकरणी तासगाव पोलिसांत शेतकर्यांनी फिर्याद दिली आहे.
पठाण हा गेल्या दहा वर्षांपासून सावळज येथे बाबा फ्रुटस् कंपनी या नावाने द्राक्ष खरेदीचा व्यवसाय करीत आहे. गेल्या तीन वर्षापासून त्याचे गव्हाण (ता.तासगाव) येथे कार्यालय होते. त्याअगोदर तो मळणगाव (ता. कवठेमहकाळ) येथे कार्यालयातून काम करीत होता. डोंगरसोनी रस्त्यावरील एका शेतकर्याचा त्याने बंगला भाड्याने घेतला होता .
गेल्या पंधरा दिवसापासून पठाण याने कासेगाव (ता. पंढरपूर), सावळज, मळणगाव, गव्हाण, डोंगरसोनी व कोगनोळी (ता. कवठेमहाकाळ) परिसरातील सुमारे 45ते 50 शेतकर्यांकडून द्राक्षे खरेदी केली होती. परंतु शेतकर्यांना काही रक्कम दिली होती. या शेतकर्यांचे लाख रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम येणे बाकी होते. ही रक्कम सुमारे दोन कोटींहून जास्त आहे.
शेतकर्यांनी पठाण याला पैशाची मागणी करायला सुरुवात केल्यानंतर त्याने प्रत्येकाला त्याने ‘दोन दिवसात तुमचा हिशोब पूर्ण करतो’, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे पैसे मिळायला विलंब होत असूनही शेतकर्यांनी त्याला द्राक्षे दिले होते.
सोमवारी (दि. 3) रात्री उशिरा पठाण शेतकर्यांची रक्कम न देताच घरातील सर्व साहित्य घेऊन पसार झाला. ही गोष्ट शेतकर्यांच्या लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी गव्हाण येथील तीन शेतकर्यांनी तासगाव पोलिसात फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज दाखल केलो. रात्री उशिरा पठाणवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज