मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अक्कलकोट रेल्वे स्थानकावर मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास उतरत असताना पाय घसरू न पडल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. शाणम्मा हणमंत हिप्परगी (वय ६०, रा. मैंदर्गी, ता. अक्कलकोट) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
मध्यरात्री एकच्या सुमारास शाणम्मा हिप्परगी या अक्कलकोट रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर रेल्वे गाडीतून खाली उतरत होत्या. खाली उतरत असताना त्यांचा पाय घसरला. यामुळे त्या खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्यास, तोंडास तसेच हातास मार लागला.
जखमी अवस्थेमध्ये त्यांना उपचारासाठी अक्कलकोट येथील सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील सिव्हील हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी मुलगा सिध्दाराम याने मध्यरात्री तीनच्या सुमारास दाखल केले.
पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज