मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. यामुळे काही सिलिंडरचा स्फोट झाला. तामलवाडी गावाजवळ ही घटना घडली आहे.
या घटनेनंतर दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. कोणतीही जिवितहानी झाली नसून घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तामलवाडी गावाजवळ HP गॅस सिलेंडरने भरलेल्या गाडीला अचानक आग लागली. 300 सिलेंडर असणाऱ्या गाडीतील काही सिलिंडरचा स्फोटही झाले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. उड्डाणपुलावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
अजुनही सिलिंडरचे स्फोट होत असून घटनास्थळावर अग्निशामक दलाच्या गाड्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज