मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-
बॅंकॉकहून आलेल्या आणखी दोन भारतीय प्रवाशांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान केरळमध्ये उपचार घेत असलेल्या तिघांची प्रकृती स्थीर असल्याचे केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितले.
या दोनही प्रवाशांना बेलीघाट रूग्णालयातील विलगता कक्षात दाखल करण्यात आले आहे. यापुर्वी अन्य एक महिलेलाही कोरानाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे कोलकात्यातील बाधीतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. त्यांच्यावर विलगता कक्षात उपचार सुरू आहेत.
विमानतळांवर आतापर्यंत दोन लाख 51 हजार 447 प्रवाशांची तपासणी केली आहे. 12 मोठ्या आणि 65 लहान बंदरांवरही तपासणी करण्यात येत आहे.
जपानमधील बंदराबाहेर ठेवण्यात आलेल्या जाहजावरील दोन भारतीयांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्याशी भारतीय दुतावास संपर्क ठेवून आहे. या जहाजावर एकूण 138 भारतीय आहेत. त्यांच्यावरील उपचारासाठी भारतीय दुतावासातर्फे प्रयत्न करत आहेत.
केरळमध्ये बाधा झालेल्या तिघांची प्रकृती स्थीर असून केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सर्व राज्यांना मार्गदर्शक सुचना आणि घ्यावयाची काळजीची माहिती पाठवण्यात आली आहे. दरम्यान, बॅंकॉकवरून येणाऱ्या आणखी एका प्रवाशात कोरोना बाधेची लक्षणे दिसल्याने त्याला विलगता कक्षात हलवण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज