मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
जिल्हा पोलिस दलातील फलटण पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेले फौजदार (पीएसआय) ज्ञानेश्वर दळवी (मूळ राहणार दौंड, पुणे) यांना तब्बल चार लाख रुपयांची लाच घेताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) अटक केली.
संशयित फौजदार दळवी यांनी २० लाख रुपयांची लाच मागितल्यानंतर १३ लाख रुपयांची तडजोड झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, ही कारवाई सोमवारी मध्यरात्री उशिरा करण्यात आली. फलटण पोलिसांवर ट्रॅप झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
फसवणूक प्रकरणात आरोपी न करण्यासाठी ही लाच मागून पैसे घेतल्याची माहिती समोर आली आहे. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
——————
मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज