mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शिवजन्मोत्सव सोहळा मंगळवेढ्यातील ५ वीरमाता,वीरपत्नींचा सत्कार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
शिवजन्मोत्सव सोहळा मंगळवेढ्यातील ५ वीरमाता,वीरपत्नींचा सत्कार

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

महाराष्ट्रात आजवर शिवप्रेमींनी अनेक सोहळे केले असतील. पण हजारो सोलापूरकर शिवभक्त महिलांनी मंगळवारी ‘न भूतो न भविष्यती’ असा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करून आपल्या लाडक्या राजाला मानवंदना दिली.तसेच देशाच्या संरक्षणासाठी त्याग करणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील पाच मातांचा महापौर श्रीकांचना यन्नम यांनी कृतज्ञता म्हणून सत्कार केला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात आजवर अनेक कार्यक्रम झाले.परंतु, शिवजन्मोत्सव सोहळ्याने नवा इतिहास घडवला. रात्री दहा वाजण्याच्या सुमाराला छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवभक्तांची दाटी झाली होती. पहिल्यांदाच भव्य-दिव्य पाळणा कार्यक्रम होत असल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि आतुरता दिसत होती.

महिला पुतळ्याच्या बाजूने बसल्या होत्या. रात्री ११ नंतर महिलांची गर्दी वाढत वाढत एसटी स्टॅँडच्या पुढे गेली. रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी झाली होती. एका बाजूला महिला तर दुसऱ्या बाजूला तरुणांची गर्दी होती. या गर्दीतून जय जिजाऊ, जय शिवरायचा जयघोष होता.

शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ राजमाता जिजाऊंचा पुतळा ठेवण्यात आला होता. या पुतळ्याच्या अगदी समोरच सजवून ठेवलेला पाळणा होता. त्यात बाळशिवबांची मूर्ती होती. दूरूनच या पाळण्याचे छायाचित्र टिपण्यासाठी महिलांची धडपड सुरू होती. ११.४५ वाजता वीरपत्नी, वीरमाता या पाळण्याजवळ आल्या. देशाच्या संरक्षणासाठी त्याग करणाऱ्या या मातांचा महापौर श्रीकांचना यन्नम यांनी कृतज्ञता म्हणून सत्कार केला.

रात्री १२ वाजता ‘झुलवा पाळणा.. पाळणा बाळ शिवाजीचा’ हे पाळणा गीत सुरू झाले आणि हजारो महिला, शिवभक्तांनी जल्लोष केला. ज्या क्षणाची सर्व जण वाट पाहत होते तो पाळण्याचा कार्यक्रम सुरू झाला. जमलेल्या महिला, मुले टाळ्या वाजवीत पाळण्याच्या गीताला दाद देऊ लागली. फुले उधळू लागली. आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. ‘जय जिजाऊ-जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष गगनात दुमदुमला. हवेत भगवा झेंडा गरगर फिरला आणि पुन्हा जय शिवरायचा जयघोष झाला.

मध्यरात्री बरोबर बारा वाजता पाळणा सुरू झाला. पाळणा झाल्याबरोबर उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव केला. हर हर महादेव, जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा सुरू झाल्या. फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश दुमदुमून गेले.

डोळ्यांचे पारणे फिटणारा शिवजन्मोत्सव सोहळा पाहून अनेकांनी संयोजकांचे कौतुक केले. उपस्थितांना लाडू वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. शिवजन्मोत्सव सोहळा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून सर्वजण अत्यंत शिस्तबद्धपणे घराकडे परतले. सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांचा पोलीस बंदोबस्त होता. पण कार्यक्रमाचे नियोजन स्वयंसेवकांनी केले. अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत हा सोहळा पार पडला.

पाळणा सोहळा वीरपत्नी सानिया मोहसीन शेख, लक्ष्मी पवार (मंगळवेढा), शांताबाई चव्हाण (बावची, मंगळवेढा),श्यामल माने (येड्राव) अलका कांबळे (मंद्रुप), सुनीता शिंदे (परंडा रोड, बार्शी), मालनबाई जगताप (कसबा पेठ, माढा), नंदा तुपसौंदर (पांढरेवस्ती, सोलापूर), हवालदार वर्षा लटके, सुरेखा पन्हाळकर (सालसे, करमाळा), सिंधू पुजारी ( होनमुर्गी, दक्षिण सोलापूर), वीरमाता वृंदादेवी गोसावी (पंढरपूर), बाई घाडगे (भोसे, मंगळवेढा)यांचा महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केले.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
बारावीच्या परीक्षेस जाणारा विद्यार्थी अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार

बारावीच्या परीक्षेस जाणारा विद्यार्थी अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

दुष्काळाचा बिमोड करण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमुठ; मंगळवेढ्यात गाजणार ३४ वी ‘पाणी संघर्ष परिषद; २६ जूनला दुष्काळग्रस्तांचा हुंकार

June 23, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रारूप आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची उडाली धावपळ; हरकती नोंदवण्यासाठी अवघे ‘इतके’ दिवस शिल्लक

June 23, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! राजकारण की समाजकारण? मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान; नेमका प्लॅन काय?

June 22, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

सावधान! मंगळवेढा बस स्टँडवर चोरटे सक्रिय; वृद्धेचे दागिने आणि रोकड लंपास, गुन्हा दाखल; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

June 22, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

June 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा