mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गणेश ढोणे खुनप्रकरनी 6 जणांना जन्मठेप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
गणेश ढोणे खुनप्रकरनी 6 जणांना जन्मठेप


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

शेतातील खांब पडल्यावरून बसवून घेण्यासाठी 850 रुपये का मागितले, या कारणावरून गणेश ढोणे यांचा खून केल्याप्रकरणी विष्णू सुळसह 6 जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.पी. आव्हाड यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


मोहोळ तालुक्यातील औंढी गावात राहणारे अनिल मारूती ढोणे व त्यांचे भाऊ गणेश मारूती ढोणे यांच्या शेतातील विद्युत खांब वार्‍याने पडला होता. त्याच खांबावरून पांडुरंग अंकुश सुळ यांनीही त्यांच्या शेतात मोटारीचे कनेक्शन घेतले होते. हा पडलेला खांब परत उभा करण्यासाठी सुळ आणि ढोणे यांनी निम्मा निम्मा खर्च करण्याचे ठरले होते.

तेव्हा अनिल ढोणे व त्यांचा भाऊ गणेश ढोणे यांनी रवींद्र भुसे, दामाजी शिंदे यांच्याकडून विद्युत खांब उभा केला व त्याची मजुरी 1700 रुपये त्यांना दिली.

त्यापैकी 850 रुपये विष्णू सुळ याच्याकडून येणे बाकी होते. ही रक्कम अनिल ढोणे यांनी मागितली असता विष्णू सुळ याने 18 जून 2016 रोजी सकाळी पैसे घेऊन जाण्यास बोलाविले. तेव्हा अनिल ढोणे व त्यांचा भाऊ गणेश ढोणे हे दोघे विष्णू सुळ याच्या शेतातील घरासमोर गेले असता तेव्हा विष्णू सुळ याने घरातून पैसे आणतो, असे म्हणून घरात जाऊन ऊस तोडण्याचा कोयता आणला आणि तुमचा आम्हाला पैसे मागण्याचा काय संबंध, असे म्हणून गणेश ढोणे यांस विष्णू सुळ, पांडुरंग सुळ, कमल सुळ, पल्लवी सुळ, सुभाष सोलनकर सर्व (रा. औंढी, ता. मोहोळ) तसेच पुळूजवाडी येथील त्यांचे नातेवाईक संजय मदने, अर्जुन मदने या सर्वांनी कोयत्याने वार करून व काठीने मारहाण करून गणेश ढोणे यांचा खून केला.


अशा आशयाची फिर्याद मयत गणेश ढोणे यांचे बंधू अनिल ढोणे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल केली. यावरून विष्णू सुळसह इतरांविरूद्ध गुन्हा दाखल केला. सदरचा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.पी. आव्हाड यांच्या कोर्टात चालला. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकून आरोपी विष्णु अंकुश सुळ (वय 25) पांडुरंग अंकुश सुळ (वय 27), सुभाष ज्ञानोबा सोलनकर (वय 46), अर्जुन पांडुरंग मदने (वय 44), संजय शामराव मदने (वय 30) अशा 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, मुळ फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. जयदीप माने, तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. पी.बी.शेंडे, फताटे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून धर्मे यांनी काम पाहिले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
केबीसी मधून असल्याचा बनाव,८७ हजारांना गंडा

केबीसी मधून असल्याचा बनाव,८७ हजारांना गंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा