
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीगच्या ( आयपीएल ) १३व्या सत्रासाठी सर्वात वयस्क खेळाडू प्रवीण तांबे ( ४८ वर्षे ) याला अखेर अपात्र ठरविण्यात आले आहे . कोलकाता नाईट रायडर्सने या क्रिकेटपटूला २० लाख रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते.
प्रवीण तांबेने २०१८ मध्ये निवृत्ती घेऊन शारजामधील टी – १० क्रिकेट लीगमध्ये सहभाग घेतला होता . याचबरोबर तो काही परदेशी टी – २० लीगमध्येही खेळलेला आहे . तांबेने त्यानंतर आपली निवृत्ती मागे घेतली होती . मात्र , तरीही ‘ बीसीसीआय ‘ ने नियमानुसार त्याला आयपीएलसाठी अपात्र घोषित केले . प्रवीण तांबे २०१६मध्ये अखेरची आयपीएल स्पर्धा खेळला होता.
आयपीएलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल यांनी कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रेंचाईजीला याबाबत माहिती दिली आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











