टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व तालुक्यातील आत्तापर्यंत 652 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 67 जण एकाच दिवशी कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
एकीकडे प्रशासन कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करत असले तरी दुसर्या बाजूला कोरोना विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. शनिवारी आणखी 10 रुग्णांची यामध्ये भर पडली आहे.त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 1 हजार 114 वर पोहचली आहे.
आज दि.26 सप्टेंबर रोज नागरिकांचे 2 स्वॅब (RT-PCR) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत.तसेच आज 57 रॅपीड ॲन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 57 रॅपीड ॲन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 10 आणि निगेटिव्ह 47 जणांचे अहवाल आलेले आहेत.सदरचे नागरिक हे मंगळवेढा 4, दामाजीनगर 1, चोखामेळा नगर 1 सलगर खुर्द 1, लक्ष्मीदहिवडी 2 आणि शेलेवाडी 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वॅब(RT-PCR) पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 114 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 652 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 439 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
In Mangalvedha taluka, on the same day, so many people were released from corona Ten new corona
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज