मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । खोड्या करतो म्हणून एका 14 वर्षांच्या मुलाला त्याच्या आत्येच्या पतीने गळा दाबून मारल्याची घटना शनिवारी घाटकोपरच्या अल्ताफ नगर, रस्सीवाला चाळ येथे घडली आहे. शिव शंभो पवार(14) असे मृत मुलाचे नाव आहे. तर हिंमत ज्ञानी गोहिल (68) असे आरोपीचे नाव आहे.
घाटकोपरच्या गोळीबार रोडला लागूनच असलेल्या अल्ताफ नगरमधील रस्सीवाला चाळीत शिव त्याच्या आईसह राहत होता. त्याच्या घराच्या बाजूलाच त्याची आत्या पती हिंमतसोबत राहते. हिंमत हा प्रचंड रागीट आहे. त्याची परिसरात वारंवार भांडणे होत असत.
लहान मुलांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे हे त्याचे नित्याचे होते.शिव त्याची खोडी काढत होता. त्याचा प्रचंड राग हिंमतच्या मनात होता. शनिवारी सायंकाळी शिवला घरी एकटा पाहून हिंमत घरात घुसला आणि त्याने एका कपड्याच्या सहाय्याने शिवचा गळा आवळून त्याची हत्या केली.
हत्येनंतर घराला कुलूप लावून त्याने घाटकोपर पोलीस ठाणे गाठले. येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना त्याने आपण शिवचा गळा आवळला असल्याची माहिती दिली. मधल्या वेळेत शिवचा चुलत भाऊ घरी आला. त्याने टाळा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा त्याला घरात शिव निपचित पडलेला दिसला. त्याने आरडाओरडा करताच आजूबाजूच्या लोकांनी एकत्रित येऊन शिवला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिवच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. शिव हा आईचा एकुलता एक मुलगा आधार होता.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज