मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जिल्ह्यात जनगणनेस (खानेसुमारी) मे महिन्यात सुरू होणार आहे. एकूण 34 मुद्यांवर होणाऱ्या जनगणनेत मोबाईल, एलईडी टीव्ही, वाहन आहे का ?, घरी शौचालय आहे का ? याची प्रथमतः माहिती घेतली जाणार आहे. जनगणना व घरयादी, घरगणना असा दोन गणना एकावेळी होणार आहे.
ऍपद्वारे जनगणना
जनगणना व घरयादी, घरगणना अशा दोन प्रकारे जनगणना होणार आहे. त्यासाठी ऍप विकसित करण्यात आले आहे. यात कोणत्याही प्रकारचा पुरावा मागितला जाणार नाही. नाव, पत्त्यानंतर मोबाईल आहे का ? घरी शौचालय आहे का ? वापरता का ? लॅपटॉप आहे का ? कोणते वाहन वापरता आदींची माहिती काही मिनिटात ऍपवर भरली जाणार आहे. 1 मे ते 15 जून दरम्यान या गणना होणार आहे. घराची गणना करताना घर कच्चे आहे की पक्के आहे? याची माहिती घेतली जाईल
1872 मध्ये पहिली जनगणना झाली होती
जनगणना ही भारताची समृद्धी परंपरा आहे. ती जगातील सर्वश्रेष्ठ जनगणनांमधील एक मानली जाते. भारतात पहिली जनगणना 1872 मध्ये झाली. ही देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी झाली. 1881 मध्ये संपूर्ण देशात एकाच वेळी जनगणना करण्यात आली. तेव्हा पासून अखंडपणे प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना केली जाते. ही जनगणना 1872 नंतरच्या अखंड मालिकेतील 16 वी व स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज