मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । रामायण, महाभारत मालिकेला लोकप्रियतेच्या शिखरावर नेणारी दूरदर्शनची आणखी १२५ प्रक्षेपण केंद्रे पाच एप्रिलपर्यंत बंद होणार आहेत. त्यामध्ये सांगली, पंढरपूरसह महाराष्टतील २१ केंद्रांचा समावेश आहे.
देशात दूरदर्शनचे आगमन झाल्यानंतर त्याचे कार्यक्रम पाहण्यासाठी दूरचित्रवाणी संचाला काड्यांचा अॅन्टेना जोडावा लागत असे. डिजीटल युग येईपर्यंत घराघरांवर असा अॅन्टेना दिसत होता. सध्या अपवादात्मक कुठेतरी ते दिसतात. खासगी चॅनेलचा प्रवेश इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये आल्यानंतर या क्षेत्राचे चित्रच पालटले.
२०१८ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. देशात सुमारे १४०० अशी प्रक्षेपण केंद्रे आहेत. पहिल्या चार टप्प्यांत यातील ६०० केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पाचव्या टप्प्यांत आणखी १२५ केंद्रे बंद होणार आहेत.
कर्मचाऱ्यांना अन्यत्र सामावून घेणार
दूरदर्शनची प्रक्षेपण केंद्रे बंद होत असल्याने तेथील कर्मचाऱ्यांना अन्यत्र सामावून घेतले जाणार आहे; मात्र त्यासाठी बदली होईल त्या ठिकाणी जाणे भाग आहे. २० ते २५ वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना हे कठीण वाटत आहे. नव्या ठिकाणी आपले कसे जमायचे, या विचाराने ते अस्वस्थ आहेत.
ही केंद्रे होणार बंद : अकलूज, बदलापूर, चिखली, हिंगणघाट, खामगाव, खोपोली, किनवट, महाड, म्हासळे, मोर्शी, पंढरपूर, परभणी, पुसद, संगमनेर, सांगली, शहादा, शिर्डी, शिरपूर, तुमसर, उमरगा, उमरखेड.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज