मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघ व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून मंगळवेढ्यात हरभरा हम भाव खरेदीच्या ऑनलाईन नोंदणी सुरुवात होणार असल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी दिली.
या प्रक्रियेत नाव नोंदणीसाठी संबंधित शेतकऱ्याचा सातबारा मूळ पिक पेरा मूळ आधार कार्ड मूळ बँक खाते पुस्तक आणि सर्वांच्या सत्यप्रती सोबत आणावयाच्या आहेत.आणलेल्या सर्व सत्यप्रती वरील मजकूर स्पष्ट दिसावा.त्यासह खरेदी विक्री संघ कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क करून मोबाईल नंबर सह नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
त्यानंतर त्या विभागाकडून एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी हमीभाव केंद्रावर आणावयाचा आहे.हरभऱ्याची रक्कम ऑनलाइन आपण दिलेल्या खात्यावर जमा होणार आहे.त्यासाठी सुस्पष्ट अशा बँक पासबुक च्या प्रती देणे आवश्यक आहे.
सन २०१८-१९ या वर्षासाठी सुधारित आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ४ हजार ८७५ रुपये असा आहे. सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह खरेदी-विक्री संघाचे शंभू नागणे (मो.९०२८५०९७७७) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी केले आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज