मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला विषारी औषध पाजून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. मोहिते यांनी पतीला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची व दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
नामदेव रामचंद्र चोरमुले (वय ४४,रा. चोरमुले वस्ती,वाघोली, ता. मोहोळ) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, नामदेव चोरमुले हा दि.१ आॅगस्ट २०१५ रोजी रात्री ८ वाजता घरी आला. तेव्हा त्याची पत्नी राणी नामदेव चोरमुले ही शेजारी असलेल्या बहीण सुनीता पाडुळे हिच्या घरात बसली होती.नामदेव चोरमुले तेथे गेला व त्याने दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करू लागला. पत्नी उठली व स्वत:च्या घरात आली. तेव्हा नामदेव चोरमुले हा घरात येऊन रात्रभर भांडत राहिला.
दुसऱ्या दिवशी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तू वागण्यास नीट नाही, तुझे कोणाबरोबर लफडे आहे असे म्हणत घरातील गोचीड मारण्याच्या औषधाची बाटली घेतली. तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत पत्नीच्या छातीवर बसून जबरदस्तीने गोचीड मारण्याचे औषध पाजले होते. औषध तोंडात गेल्याने पत्नीला त्रास होऊ लागला व ती बेशुद्ध झाली होती. नातेवाईकांनी तिला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात तिची फिर्याद घेतली.
या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. नामदेव चोरमुले याला अटक करून सहायक पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे व डी.बी. खैरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. अहमद काझी तर आरोपीतर्फे अॅड. एस.आर. शेटे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल धर्मे यांनी काम पाहिले.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज