मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । तेलंगणातील वानापार्थी येथील एका शाळेत ११ अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली. खासगी शाळेतील शिक्षकाने ११ अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. या घटनेतील लहान मुली या चौथीच्या वर्गात शिकत होत्या. यातील काही मुलींवर शाळेच्या परिसरातच अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वय २६ आहे. १० वर्षाच्या एका मुलीच्या पालकांडून तक्रार केल्यावर हे प्रकरण समोर आले.दरम्यान, आरोपीवर भारतीय दंड संहिते अंतर्गत ३७६ आणि पॉक्सो कायद्यान्वये त्याला अटक केली आहे. पीडित मुलींवर शाळेच्या परिसरात अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या तर काही मुलींचे लैंगिक शोषणही करण्यात आले. या घटना खासगी क्लासच्या वेळी घडल्याचे पोलिसांनी सांगीतले
डीएसपी किरण कुमार म्हणाले की दोन मुलींनी आपल्या वडिलांकडे गुप्तांगातून रक्तस्त्राव होत असल्याचे सांगितले. यावर पालकांनी विचारल्यास मुलींकडून शिक्षकांनी आमच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. यानंतर पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यावर हे प्रकरण समोर आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज