मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । महाविकास आघाडी सरकार लवकरच राज्यात शिक्षकांची मेगा भरती करेल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच टेट डी.एड.,बी.एड.धारक पात्र उमेदवारांना मुंबईत दिले. त्यामुळे आझाद मैदानात सुरु असलेल्या डी.एड., बी.एड.धारक पात्र उमेदवारांचे उपोषण स्थगित करण्यात आले.याबाबतची माहिती बंजारा क्रांती दल मराठवाडा युवा संघटक प्रा.संतोषकुमार राठोड यांनी शनिवारी दिली.
शिक्षक भरती दुसरी 2020 तत्काळ जाहीर करुन शिक्षक निवड मुख्य परिक्षा अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (टीएआयटी) दुसरी परिक्षा 2020 ची तारीख तत्काळ जाहीर करावी या मागणीसाठी 24 फेब—ुवारी 2020 पासून उपोषण सुरु करण्यात आले होते.
या मागणीसाठी शिष्टमंडळाने मंत्री वर्षा गायकवाड यांची विधानभवनात भेट घेतली. विधानसभा अधिवेशनानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात व 2020 ला राज्यामध्ये मराठी भाषा कायदा लागू केल्याने सुमारे 20 हजार जागा शिक्षकांच्या रिक्त आहेत. तसेच सेवानिवृत्त होणारी संख्या सुमारे दहा हजार पुढे आहे. मागील सरकारने घोषित केलेली 24 हजारांपैकी 12 हजार रिक्त पदे आहेत. त्यामुळे लवकरच शिक्षकांची मेगा भरती करु, असे मंत्री गायकवाड यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे डी.एड.,बी.एड.धारक पात्र उमेदवारांनी उपोषण स्थगित केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज