mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचा ७१ वा वाढदिवस शनिवार दि. ७ मार्च रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.दरम्यान सकाळी १० वा. पंढरपूर रोड, एम.एस. ई. बी जवळ मंगळवेढा येथे रेवनिल ब्लड बँक सांगोला यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन सोहळा पंढरपूर येथील एम.एस. सर्जन डॉ. एम. आर. टकले यांच्या हस्ते व मंगळवेढा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रा. शिवाजीराव काळुंगे, डॉ. भीमाशंकर बिराजदार, पंढरपूर येथील भूलतज्ञ डॉ. राजेंद्र जाधव, डॉ.शरद शिर्के, डॉ. नितीन आसबे, सी. ए. आंनद करवंदे, सीताराम साखर कारखान्याचे चेअरमन समाधान काळे, डॉ. एन.बी. पवार, रामकृष्ण नागणे, युन्नूसभाई शेख, महादेव कोरे, धनश्री पतसंस्था व मल्टिस्टेटच्या चेअरमन शोभाताई काळुंगे, डॉ. प्रिती शिर्के, धनश्री मल्टिस्टेटच्या संचालिका डॉ. राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड, धनश्री पतसंसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनीता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉक्टर एम. आर. टकले यांनी रक्ताचे महत्व सांगत जगात रक्त हे कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सर्वांनी रक्तदान करून गरजू लोकांना जीवनदान देण्याचे आपल्या जीवनातील महत्वाचे कार्य पार पाडावे असे त्यांनी बोलताना सांगितले. याप्रसंगी सुमारे जवळपास २२५ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. यावेळी धनश्री परिवाराच्यावतीने प्रत्येक रक्तदात्यांना जार व 2 लि. कुकर ही भेटवस्तू देण्यात आली.

सायंकाळी ७ वा. सुरसंगम म्युझिकल ग्रूप मंगळवेढा प्रस्तुत महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहम्मद आयाज व इतर कलावंतांचा जुन्या – नवीन गाण्याचा गीतबहार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते व माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रा. शिवाजीराव काळुंगे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हा. बबनराव आवताडे, गायक मोहम्मद आयाज, शोभाताई काळुंगे, डॉ. राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड, ऍड. रमेश जोशी, डॉ. सुभाष कदम, नागेश फाटे, बाबुभाई मकानदार सुरसंगम ग्रुपचे दिगंबर भगरे, लहू ढगे, भीमराव मोरे, फिरोज मुलाणी, डी बिल्डर्स दत्तात्रय बागल, तात्यासाहेब चव्हाण, मोहन जुंदळे, लक्ष्मण नागणे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.

मोहम्मद आयाज यांनी ओंकार स्वरूपा, आज हम तुम ओ सनम, भुला साथी कोई दुजा, मुझे दोष ना देना जग वालो, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, आन से उसके आये बहार, हर घडी बदल रही है रूप जिंदगी, आगे भी जाने ना तू, तुम्हारी नजर क्यों खपा हो गयी अशी एका पेक्षा अनेक गाणी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमात पंढरपूरचे रफिक शेख, सुरसंगम ग्रुपचे दिगंबर भगरे, लहू ढगे, अनिल गायकवाड, लक्ष्मी माने, यांनीही विविध गीते सादर करून रसिकांची मने जिंकली.

तसेच प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताई मतीमंद शाळा लवंगी व एकलासपूर, तावशी येथील प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.त्याचबरोबर प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचा वाढदिवसानिमित्त दिवसभर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या जीवनसाथी या निवासस्थानी उपस्थित राहून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षांव केला.

महिला दिनानिमित्त आज व्याख्यान

धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंढरपूर रोड, एम.एस. ई. बी जवळ मंगळवेढा येथे आजच्या स्त्री समोरील आव्हाने? या विषयावर मोहोळ येथील डॉ. स्मिता पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन मंगळवेढाच्या नगराध्यक्षा अरुणा माळी यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी पं. स. सभापती प्रेरणा मासाळ, डॉ. राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड, मंगळवेढा आगार व्यवस्थापक मधुरा जाधवर, चोखामेळानगरच्या सरपंच इंदुमती माने यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. तरी मंगळवेढा शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन धनश्री परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात चोरांचा धुमाकूळ,चार घरफोड्या लाखोंच्या मुद्देमालावर डल्ला

मंगळवेढ्यात चोरांचा धुमाकूळ,चार घरफोड्या लाखोंच्या मुद्देमालावर डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा