mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 893 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 893 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जिल्ह्यातील वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदार असलेल्या दोन हजार 893 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. याशिवाय आठ हजार 24 थकबाकीदारांनी तीन कोटी 35 लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा केला आहे.

महावितरणकडून सद्यःस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने मोठ्या रकमेचे थकबाकीदार असणाऱ्या वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.

गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील अकलूज विभागात थकबाकीदार असलेल्या वाणिज्यिक व औद्योगिक 1112 ग्राहकांनी 36 लाख 5 हजार रुपयांचा भरणा केला. 23 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे 481 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. बार्शी विभागात 2552 थकबाकीदारांनी 1 कोटी 10 लाख रुपयांचा भरणा केला. 50 लाख 92 रुपयांची थकबाकी असलेल्या 673 ग्राहकांची वीज खंडित केली. पंढरपूर विभागात 1331 थकबाकीदारांनी 47 लाख 9 हजार रुपयांचा भरणा केला. 22 लाख रुपयांच्या थकबाकीदार 414 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. सोलापूर शहर व ग्रामीण या दोन विभागात 3029 थकबाकीदारांनी 1 कोटी 40 लाख रुपयांचा भरणा केला आहे. 88 लाख 13 हजारांची थकबाकी असलेल्या 1325 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबिल भरणा केंद्र, ई-वॉलेटची सोय उपलब्ध आहे. चालू व थकीत वीजबिलाचा घरबसल्या भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाइट तसेच मोबाईल ऍपद्वारे “ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी थकीत रकमेचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post

सांगोल्यात पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपीचे पलायन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा