मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । काँग्रेसची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सत्तानाट्यच रंगले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काठावर बहुमत असलेले कमलनाथ सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाने काँग्रेसच्या १७ आमदारांना कर्नाटकमध्ये हलवले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील भाजपाचे एक आमदार काँग्रेसच्या आमदारांना घेऊन बंगळुरूला पोहोचले आहेत. तसेच या आमदारांना बंगळुरूबाहेरच्या कुठल्यातरी रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार इमरती देवी, प्रद्युम्न सिंह तोमर, महेंद्र सिंह सिसोदिया, तुलसी सिलावट, प्रभुराम चौधरी आणि गोविंद सिंह राजपूत हे आमदार कर्नाटकात पोहोचल्याचे वृत्त आहे
.
दरम्यान, या घडामोडींनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाला आता स्वस्थ बसवत नाही आहे. गेल्या १५ वर्षांत त्यांनी जो काही भ्रष्टाचार केला आहे, तो आता समोर येत आहे. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत, असे कमलनाथ म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज