मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना सर्कल अधिकाऱ्यांना दम भरला आहे. सर्कल अधिकाऱ्यांना सांगतो माझी सटकली तर तुझी वाट लागेल, अशा शब्दात अजित पवारांनी सज्ज दम दिला. अजित पवार यांनी यावेळी नवा रस्ता बांधून झाल्यावर जर एका पावसात रस्ते खराब झाले, तर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येईल असं स्पष्ट सांगितलं. तसंच कोणता अधिकारी चिरीमिरी मागत असेल तर त्याचे नाव मला सांगा, मी बघतो त्यांच्याकडे, अशी तंबीही अजित पवारांनी दिली.
महिलांवरील अत्याचारासंदर्भात कडक कायदा आणला जात असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तक्रार आल्यास पोलिसांनी कारवाई करावी असं सांगताना अजित पवार यांनी हे सरकार कोणाच्या दडपशाहीने चालणार नाही.
“ज्या मताधिक्याने तुम्ही आमच्या रोहितला निवडून दिलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आता यापुढे सर्व जबाबदारी आमची. आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो हे सर्वांना माहिती. मी तुमच्या आणि रोहितच्या पाठीशी आहे.
कर्जत जामखेड हा माझा आवडता मतदारसंघ आहे, या तालुक्यांशी माझे भावनिक नाते आहे.१२ पैकी ९ जागा निवडून दिल्या बद्दल मी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार. तुमचं नाणं खणखणीत आहे ते आम्ही वाजवणारच,” असंही यावेळी अजित पवार म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज