
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जागा माझ्या नावाने करून दे व 10 लाख रुपये देऊन सोडचिठ्ठी दे, असे म्हणून पती शंकर वाघमारे यांना मारहाण केल्याप्रकरणी पत्नी उषादेवी शंकर वाघमारे व मेव्हणा महादेव मल्लय्या भिसे या दोघांविरूद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी संतोष कुर्वे यांच्या कोर्टात फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.
होटगी रोडवरील ड्रीमलँड सोसायटीमध्ये राहणारे शंकर सुधाकर वाघमारे यांचा विवाह उषादेवी हिच्याबरोबर 9 वर्षांपूर्वी झाला होता. मागील 3 वर्षांपासून पत्नी उषादेवी ही मुलाला घेऊन वेगळे राहत होती. लग्नानंतर पत्नी उषादेवी व मेव्हणा महादेव भिसे हे शंकर वाघमारे यांना जागेची वाटणी दे म्हणून सतत त्रास देऊन मारहाण करत होते तसेच 3 जून 2019 रोजी शंकर यांची पत्नी उषादेवी व मेव्हणा महादेव भिसे हे दोघे शंकर वाघमारे यांच्याकडे येऊन जागा माझ्या नावावर करून दे आणि 10 लाख रुपये दे व घटस्फोट दे, असे म्हणून शंकर यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व खलास करण्याची धमकी दिली.
हा खटला न्यायदंडाधिकारी संतोष कुर्वे यांच्या कोर्टात चालला. यावेळी न्यायाधीशांनी वकिलांचा युक्तिवाद ऐकून शंकर वाघमारे यांची पत्नी उषादेवी व मेव्हणा महादेव भिसे या दोघांविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. दोघांविरूद्ध प्रोसेस इश्यूचा आदेश लागू करून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.यात फिर्यादी शंकर वाघमारे यांच्या वतीने अॅड. श्रीनिवास कटकूर व अॅड. किरण कटकूर यांनी काम पाहिले.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












