मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावरील काष्टी शिवारात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून आलेल्या टेम्पोने जोराची धडक दिली. या अपघातात सिंदखेडा जि. धुळे येथील दोन महिला जागीच ठार झाल्या असून १ पुरुष गंभीर जखमी आहे. टेम्पोतील इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान मयतांची ओळख पटली नसून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिंदखेडा जि. धुळे येथील ऊस तोडणी कामगार सांगली जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी गेले होते.ऊस हंगाम संपल्याने ते सांगली येथून टेम्पोतून साहित्य घेऊन गावी निघाले होते. आज पहाटे पाचच्या दरम्यान टेम्पो काष्टी शिवारातील राहिंजवाडी येथे आला असता रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या दुसऱ्या टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत टेम्पोत बसलेल्या २० प्रवाशांपैकी २ महिला प्रवाशांना जास्त मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर एक पुरुष गंभीर जखमी झाला आहे. इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज