मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । किरकोळ कारणावरून वाद होऊन भावाच्या डोक्यात दगड घालुन भावाला जखमी केल्यामुळे मौला मकबुल गुड्डापुरे ( वय ३६ , रा . न्यु फॉरेस्ट तिहे गाव ) याच्याविरुध्द सदर बाझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत राजबक्ष मकबुल गुडडापुरे ( वय ३२ , रा . न्यु फॉरेस्ट , तिहे गाव ) यांनी फिर्याद दिली आहे . याबाबत आधिक माहिती अशी की , राजबक्ष गुड्डापुरे हे आपल्या आई सोबत चर्चा करत थांबले असता आरोपी मौला गुड्डापूरे हा येऊन तुझे जास्त बोलने सुरू आहे तुला बघुन घेतो म्हणत राजबक्ष याच्याशी वाद घातले . वादाचे रुपांतर भांडणात झाले . यावेळी मौला गुड्डापूरे याने राजबक्ष गुड्डापूरे याच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी केले.
यामुळे राजबक्ष यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून मौला गुड्डापूरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे . घटनेचा तपास पोना आरशेवार हे करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज