मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । ग्रामीण पोलीस पेट्रोल पंपावरील सेल्समनच्या सांगण्यावरून कागदोपत्रे देऊन एसबीआयचे क्रेडिट कार्ड घेतले . कार्ड अॅक्टीव्ह नसतानाही ९४ हजारांची ऑनलाईन खरेदी करून फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात इसमांविरूद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नानासाहेब मधुकर पाटेकर ( वय ३२ , रा . अरविंद धाम पोलीस वसाहत , मुरारजी पेठ ) यांनी फिर्याद दिली आहे . फिर्यादी नानासाहेब पाटेकर हे मोटार सायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावर गेले होते . त्याठिकाणी एक सेल्समन भेटला व त्याने नानासाहेब पाटेकर यांना तुम्ही एसबीआयचे क्रेडिट कार्ड घेतले तर तुम्हाला ५ टक्के डिस्काऊंट मिळेल , तसेच तुम्हाला १ लाख रूपयाचे क्रेडिट कार्ड मिळेल , असे सांगितले.
तेव्हा पाटेकर यांना ते योग्य वाटल्याने कार्ड घेण्यासाठी पॅन कार्ड झेरॉक्स , फोटो , फॉर्म भरून ती माहिती सबमिट केली . त्यानंतर पाटेकर यांच्या पत्त्यावर क्रेडीट कार्ड प्राप्त झाले . त्यानंतर त्यांनी कार्ड अॅक्टीव्ह न करता तसेच ठेवले . त्यानंतर पाटेकर यांना फोन आला . तुमच्या क्रेडिट कार्डचे पेमेंट ४ हजार ७८८ रूपये भरा , असे त्यांना सांगण्यात आले . क्रेडिट कार्ड अजूनही अॅक्टीव्ह केलेले नसताना कसला हप्ता भरू असे म्हणून त्यांनी कस्टमर केअर हेल्पलाईन टोल फ्री क्रमांकावर फोन लावून विचारले.
मी काही खरेदी न करता मला बिल कसे आले असे विचारले असता त्यांनी सांगितले की , तुमच्या क्रेडिट कार्डवरून ३१ जानेवारी रोजी मोबिक्वीक डॉट कॉमवरून प्रत्येकी ३१ हजार ५०० रूपयांचे ३ वेळा असे एकूण ९४ हजार ५०० रूपयांची ऑनलाईन खरेदी झालेली आहे . त्याचे पैसे भरा असे सांगितले . तेव्हा पाटेकर यांनी ७ मार्च रोजी एसबीआय बँकेच्या कस्टमर केअरला ऑनलाईन ईमेलवरून तक्रार केला . क्रेडिट कार्ड अॅक्टीव्ह नसताना , कोणीतरी अज्ञात इसमाने कार्ड हॅक करून ऑनलाईन वापर केला आहे आणि त्यातून ९४ हजार ५०० रूपयांची ऑनलाईन खरेदी करून फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राऊत हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज