मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कतारमधून आलेल्या दोघांना मंगळवेढयातील तुकाईनगर येथील मुलींच्या वसतीगृहात कोरोना विलगीकरण कक्षात आरोग्य विभागाने ठेवण्यात आले आहे.दरम्यान हे दोघे पोलिसांच्या निगराणीखाली आहेत.कचरेवाडी येथील व हन्नूर येथील दोन इसम कतारमधून दि.२१ रोजी विमानाने मुंबईला आले.या दोघांची मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात येवून हातावर शिक्का मारला असला तरी मंगळवेढा तालुक्यात एकही रुग्ण नाही. केवळ बाहेर देशातून आलेत म्हणून खबरदारी घेतलीी जात आहे.
तदनंतर या दोघांनी खाजगी ट्रॅव्हर्ल्सने सोलापूर गाठले.सोलापूर ते मंगळवेढा एका ट्रकने प्रवास केला.हे दोघेही गावाकडे न जाता त्यांनी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात जावून तपासणी केली. आरोग्य खात्याने या दोघांना दि.२२ रोजी संध्याकाळी तुकाईनगरमध्ये असलेल्या मुलींच्या वसतीगृहात विलगीकरण कक्षात ठेवले.येथे पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने त्या दोघांचे पाण्याविना हाल झाल्याचे सांगण्यात आले.
त्या दोघांना आरोग्य खात्याने हँड वॉश अथवा साबण व इतर साहित्य देणे गरजेचे असताना कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने दामाजी नगर ग्रामपंचायतीचे सरपंच अॅड .दत्तात्रय तोडकरी यांनी स्वतः पैसे खर्च करून साहित्य खरेदी करून त्या दोघांना देण्यात आले.ते दोघे परदेशातून आल्यामुळे त्यांनी तोंडाला मास्क लावून बंदिस्त खोलीत राहणे अपेक्षित असताना ते दोघे गच्चीवर विना मास्कचे फिरत असल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहिल्यानंतर नागरिक मंगळवारी सकाळी ११.०० वा. वसतीगृहाकडे गेले.
परदेशातून आलेल्या दोन व्यक्ती वसतीगृहात रहात असल्याची खबर वाऱ्यासारखी परिसरात पसरताच लोकांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले. येथील लोकांनी तहसीलदार यांना एक निवेदन देवून वसतीगृहासभोवताली मोठया प्रमाणात नागरिक वसाहत असल्याने तेथे वयोवृध्द पुरुष व महिला वर्ग ,लहान मुले रहात आहेत.त्या दोन इसमामुळे परिसरात भितीयुक्त वातावरण पसरले असून त्या दोघांना लोक वसाहतीव्यतिरिक्त ठिकाणी ठेवावे असे निवेदन दामाजी नगर हद्दीतील २० ते २५ लोकांनी तहसीलदार यांना दिले आहे.
होम क्वारंटाईन्ड केलेल्या नागरिकांनी शासनाने दिलेल्या निबंधाचे व्यवस्थित पालन करावे. याशिवाय शासनाकडून ज्या संबंधितांना त्या त्या गावातील होम क्वारंटाईन्ड असलेल्या नागरिकांवर त्यांच्याकडून शासन आदेशाचे उल्लंघन होणार नाही, हे पाहण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.त्यांनी आपले काम जबाबदारीने पार पाडावे. – डॉ.नंदकुमार शिंदे,तालुका आरोग्य अधिकारी, मंगळवेढा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज