मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा येथील सामाजिक कार्य करणाऱ्या वारी परिवार या सामाजिक संस्थेने शहरात संचारबंदी असताना पोलीसांच्या अल्पोपहाराची सोय केलेली आहे.
कोरोना या विषाणूमुळे संपूर्ण राज्यात हाहाकार माजल्यामुळे शहरातील सर्व दुकाने बंद आहेत त्यासाठी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना शिस्त लावण्यासाठी बाहेरगावाहून बंदोबस्तासाठी पोलीस बांधव दिवसरात्र आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करून कर्तव्य बजावत आहेत.
सदरचे पोलीस आपल्या घरापासून दूर असल्याने तसेच मंगळवेढा शहरात त्यांचे कोणीही नातेवाईक नसल्याने वारी परिवाराने मात्र पुढे येऊन पोलीसांच्या नाष्टयाची व्यवस्था करून सामाजिक बांधीलकी जपली आहे शहरात दामाजी चौक,बोराळे नाका,बायपास रोड आदी ठिकाणी पोलीस आपली सेवा बजावित आहेत.
अशा पोलीस बांधवांना एक आधार म्हणून वारी परिवाराच्या वतीने दररोज सकाळी ८:३० वाजता नाष्टा जागेवरती पुरविण्यात येणार आहे वारी परिवारातील दररोज एका सदस्याच्या घरी नाष्टा तयार केला जातो आणि संचारबंदीचे नियम पाळून,गर्दी न करता पोहच केला जात आहे यासाठी पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी यांनी परिवाराचे आभार मानले आहेत वारी परिवाराने हाती घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज