टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड होताच माजी आमदार दिलीप माने यांनी दूध संघात महत्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे. दूध संघाला आर्थिक व प्रशासकीय शिस्त लावण्यास सोबतच आता दूध उत्पादकांच्या मूळ समस्या जाणून घेतल्या जात आहेत.
यासाठी जिल्हा दूध संघाचे चेअरमन दिलीप माने यांनी प्रत्येक तालुक्याचा दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यातून ते दूध उत्पादकांशी संवाद साधत आहेत.
मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील दूध उत्पादकांशी संवाद साधला. दूध संघाला दूध देण्यासाठी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांनी दूध उत्पादकांकडून जाणून घेतल्या.
बैठक घेण्यापूर्वी अक्कलकोट तालुक्यातून जिल्हा दूध संघाला एक लिटरही दूध मिळत नव्हते. बैठक होतात या तालुक्यातून एक हजार लिटर दूध संघाकडे येऊ लागले आहे.
या तालुक्यांच्या बैठकीनंतर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष दिलीप माने यांनी मंगळवेढा तालुक्यातील दूध उत्पादकांशी संवाद साधला. मंगळवेढ्यातील जिल्हा दूध संघाच्या दूध शीतकरण केंद्रावर जाऊन त्यांनी तेथील केंद्राचीही पाहणी केली.
यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक बबनराव आवताडे, शिवाजी नागणे, औदुंबर वाडेकर,जयंत साळे व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे,समर्थ डेअरीचे चेअरमन संतोष कोंडूभैरी,पंचायत समितीचे सदस्य नितीन पाटील यांच्यासह दूध संघाचे आजी-माजी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष माने म्हणाले, उर्वरित सर्व तालुक्यांचाही अशाच पद्धतीने दौरा होणार आहे.
या दौऱ्याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे त्या तालुक्यातील संचालक, श्रेष्ठी यांना सोबत घेऊन थेट दूध उत्पादक अशी चर्चा केली जाणार आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत सर्व तालुक्याचे दौरे पूर्ण करून दूध उत्पादकांना भेडसावणाऱ्या सामाईक समस्यांवर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल.
शेतकरी म्हणतात वेळेवर पैसे, पशुखाद्य द्या
जिल्हा दूध संघाला दूध देण्यास आम्ही तयार आहोत. आम्हाला अकराव्या दिवशी दुधाचे पेमेंट द्या, पशुखाद्य वेळेवर द्या, इतर दूध सांघाप्रमाणे भाव वाढ करा अशा समस्या दूध उत्पादक मांडत आहेत.
Solapur District Milk Association Farmers say pay on time, give animal feed; President Dilip Mane interacts with milk producers
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज