मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । संपूर्ण देशात कोरोणा विषाणूच्या प्रसारामुळे हाहाकार निर्माण झाला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने दवाखान्यातील रूग्णांना रक्ताची कमतरता जाणवत असल्याने अनेकांचे जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्र शासनावतीने विविध सामाजिक संघटनांनी रक्तदान शिबीरे आयोजित करावीत असे आवाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद म्हणून मंगळवेढा येथील विविध सामाजिक संस्था,मंडळे यांच्या पुढाकारातून दिनांक २९ मार्च रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत श्रीराम मंगल कार्यालय येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदरच्या महा रक्तदान शिबीर मध्ये तब्बल ३२१ रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोना बाधित रूग्णांना आधार देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे रेवनील रक्तपेढीच्या सहकार्याने घेतलेल्या रक्तदान शिबीरात प्रशासनाच्या सूचना पाळून शिस्तबद्ध पध्दतीने एकाच वेळा गर्दी न करता हे शिबीर घेण्यात आले जेंव्हा जेंव्हा राज्यामध्ये संकटे आली आहेत तेंव्हा तेंव्हा मंगळवेढा सदैव मदत करण्यासाठी पुढे आलेला आहे.
सदरचे शिबीर यशस्वी करण्यासाठी जगदंब परिवार, श्रीराम फाउंडेशन,सरकार गुप, गौरू दादा मित्रपरिवार,खिदमत चारिटेबल ट्रस्ट,संभाजी ब्रिगेड वारी परिवार,सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ,पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळ,बसवेश्वर जयंती उत्सव मंडळ,महर्षी वाल्मिक जयंती उत्सव मंडळ,संत सेना महाराज मंडळ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ, आदी संस्था व मंडळानी परीश्रम घेतले यावेळी मंगळवेढा पोलीस प्रशासन,नगरपरिषद मंगळवेढा, तहसिल कार्यालयाचे विशेष सहकार्य लाभले, सर्व रक्तदात्यांनी सर्व संस्थाचे आवाहनास प्रतिसाद देवून रक्तदान केल्याबद्दल संयोजकाचे वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज