मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनामुळे मरण पावलेल्या दुकानदाराच्या संपर्कातील ९१ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. यात केवळ एका महिलेची टेस्ट पॉझीटिव्ह आढळून आली. उर्वरित ९० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
विशेष म्हणजे किराणा दुकानदाराच्या कुटूंबातील सर्व सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. कोरोनामुळे तेलंगी पाच्छा पेठेतील एका किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला होता. दुकानदाराच्या कुटूंबातील आणि संपर्कातील ६१ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यानंतर या दुकानदाराला सुरुवातीला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या खासगी रुग्णालयातील ३० जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी या रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह ठरला. तिला कोरोनाची लागण झाली आहे. उर्वरित डॉक्टर, नर्स यांना लागण झालेली नाही, असे रिपोर्ट सांगतात. दुकानदाराच्या कुटूंबातील सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
तसेच आज एक महिला कोरोना पॉझिटिव्ह मिळाली आहे, तिच्याशी संबंधितही सोळा जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. याचेही अहवाल उद्या सकाळपर्यंत अपेक्षित आहेत.
————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज