मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी परराज्यातून प्रवास करण्यास बंदी असताना त्याचा भंग करून मंगळवेढयात आल्या प्रकरणी राजस्थान येथील आठ व कर्नाटकातील चार अशा बारा मोटर सायकलस्वारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , राज्यभरात कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातल्याने त्याला रोखण्यासाठी शासनाने जमावबंदी आदेश काढून राज्याच्या,जिल्हयाच्या सीमा लॉक केल्या आहेत.दि.१४ रोजी ९.३० वा. यातील आरोपी कृष्णा बहिरा रामजी, कृष्णाराव मदनजी, पैलाज राम केसराराम, मदयाराम जोगाराम, महेंद्रकुमार फजर, जोधाराम रावता, गमूनाराम जोगारा, कैलास रुढाराम आदी मोटर सायकलवरून कर्नाटक राज्यातील चडचण येथून बालाजीनगर गावच्या शिवारातून राजस्थानकडे जात असताना बेकायदेशीरपणे प्रवास करताना मिळून आले.
याबाबतची फिर्याद पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी यांनी दिल्यावर वरील आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या घटनेत यातील आरोपी महादेव भिमशा बिराजदार, प्रकाश श्रीशैल्य बिराजदार, रामगोंडा विठ्ठल बिराजदार, मल्लाप्पा म्हाळाप्पा पुजारी सर्व रा.जेऊर ता.इंडी, कर्नाटक येथून महाराष्ट्र राज्यातील हलजंती येथे मोटर सायकलवर येत असताना. १३ रोजी ८.३० च्या दरम्यान शिवणगी चेक पोस्ट येथे मिळून आले.पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे प्रवासाबाबत कुठल्याही अधिकृत परवाना नसताना ते प्रवास करीत असताना पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. वरील चौघांना शासनाच्या आदेशाचा भंग केला म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत गुन्हा दाखल करून बालाजी नगर आश्रमशाळा येथे ठेवण्यात आले आहे.याची फिर्याद सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे यांनी दिली आहे.
————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज