mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

CoronaVirus : कोरोना’ची कशी आहे सोलापूर जिल्ह्यातील उपचार व्यवस्था!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
CoronaVirus : कोरोना’ची कशी आहे सोलापूर जिल्ह्यातील उपचार व्यवस्था!

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर शहर आणि जिल्हयात कोव्हीड :१९ या आजाराच्या रुग्णांसाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्रिस्तरीय यंत्रणा उभी करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिाकारी मिलींद शंभरकर यांनी दिली.

कोव्हीड:१९ अर्थात कोरोनाा विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांसाठी उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खास यंत्रणा तयार केली आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे ४७५७ इतके डॉक्टर, ब्रदर, तंत्रज्ञ आणि परिचारिका असे मनुष्यबळ उपलब्ध आहे. यातील ४५६२ जणांना कोरोना रुग्णांवर कसे उपचार करायचे याबाबत खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोरोना आजाराच्या रुग्णांच्या सर्वेक्षणासाठी २८३५ आशा वर्करची मदत घेण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी त्रिस्तरीय उपचार यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यात कोव्हिड केअर, कोव्हिड डेडीकेड हेल्थ आणि कोव्हिड हॉस्पीटल अशा टप्प्यांच्या समावेश आहे. कोव्हिड केअरमध्ये संशयितांवर उपचार केले जात आहेत. कोव्हिड डेडीकेडमध्ये मध्यम स्वरूपाचे सिमटम आढळलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत तर कोव्हिड हॉस्पीटलमध्ये तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

अशी आहेत उपचाराची ठिकाणे

महापालिका क्षेत्रात ६ ठिकाणी कोव्हीड केअरची व्यवस्था असून, यात २८२५ रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. कोव्हिड हेल्थची ६ ठिकाणे असून या ठिकाणी ५४0 रुग्णांची व्यवस्था आहे. कोव्हिड हॉस्पीटलची तीन ठिकाणी व्यवस्था असून, या ठिकाणी ६२0 व्यक्तींवर उपचाराची व्यवस्था आहे. सिव्हिल हॉस्पीटल (शासकीय रुग्णालय), अश्विनी व यशोधरा रुग्णालयाचा यात समावेश आहे.

जिल्ह्यात २५ ठिकाणी व्यवस्था

जिल्ह्यात ११ तालुके व महत्वाची मोठी गावे अशा २५ ठिकाणी कोव्हिड केअरची व्यवस्था असून येथे ४ हजार ८६0 रुग्णांची सोय होणार आहे. त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणी हेल्थ सेंटरची व्यवस्था असून, यात ७२९ जणांवर उपचार करण्याची सोय आहे. तसेच कोव्हिड हॉस्पीटलसाठी ६ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून, ६५८ तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय खाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याची तयारी असून, गरज भासल्यानंतर ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Recent NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मुंबई, पुण्यात सरकारी कार्यालयातील उपस्थिती पुन्हा ५ टक्के

मुंबई, पुण्यात सरकारी कार्यालयातील उपस्थिती पुन्हा ५ टक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा