mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Lockdown : महाराष्ट्रातील तरुण सरपंचांच्या संवादाने पंतप्रधान मोदीही प्रभावित

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
Lockdown : महाराष्ट्रातील तरुण सरपंचांच्या संवादाने पंतप्रधान मोदीही प्रभावित

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । तुमच्यासारखी सुशिक्षित सरपंच बरंच काही करू शकेल, बचतगटांद्वारे वेगवेगळी उत्पादने तयार करा आणि सरकारच्या अँपवर अपलोड करा, त्याला देशभरातून प्रतिसाद मिळेल….,’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे जिल्ह्यातील मेदनकरवाडी गावच्या तरुण सरपंच प्रियंका मेदनकर यांना हा सल्ला दिला. पंतप्रधान मोदी यांनी आज पंचायत राज दिनानिमित्ताने देशभरातील निवडक सरपंचांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधला. तेव्हा मेदनकरवाडीच्या महिला सरपंच प्रियंका मेदनकर यांनी लॉकडाऊन दरम्यान गावात केलेल्या प्रभावी उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली. पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रियंका यांनी मोठ्या आत्मविश्वासानं आणि मुद्देसूद उत्तरे दिली आणि त्यांच्या उत्तरानं पंतप्रधानही प्रभावित झाले.

कर्नाटक, बिहार, पंजाबमधील सरपंचांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील पुण्याजवळच्या मेदनकरवाडीच्या सरपंच प्रियंका मेदनकर यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनमध्ये गावातील उपाययोजनांबाबत पंतप्रधानांनी प्रियंका यांना प्रश्न विचारला, तेव्हा गावात केलेल्या प्रभावी उपाययोजनांची अत्यंत मुद्देसूद माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. गावात लॉकडाऊनच्या आदेशाचं पालन कशा पद्धतीनं केलं जात आहे, रेशन दुकानं, भाजी बाजारात गर्दी होऊ नये म्हणून कसं नियोजन केलं, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांचा माल थेट पोहचवण्यासाठी केलेलं नियोजन, गावात सॅनिटायरचं वाटप, क्वारंटाईन सुविधा, लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यानंतर गावात पुन्हा एकदा निर्जंतुकीकरण अशा अनेक उपाययोजनांची माहिती प्रियंका यांनी दिली.

तुमच्या गावातील लोक आता थकले असतील, ते म्हणत असतील मोदींनी हे काय केले आहे? असं पंतप्रधान मोदी यांनी प्रियंकांना विचारलं. तेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान हे आमच्या आरोग्यासाठीच करत आहेत, अशी लोकांची भावना असल्याचं उत्तर प्रियंका यांनी दिलं. त्यानंतर पंतप्रधानांनी गावची लोकसंख्या किती आहे असा प्रश्न प्रियंका यांना केला. २०११ च्या जनगणनेनुसार गावात १२ हजार ५७६ इतकी लोकसंख्या असल्याची माहिती पंतप्रधानांना दिली. तसंच जवळच चाकण एमआयडीसी असल्याने परप्रांतातील ५० हजार लोक गावात राहतात अशी माहितीही दिली. गावातील बचत गटाच्या महिलांनी ५००० मास्क बनवल्याची माहिती प्रियंका यांनी दिली तेव्हा त्यांचं अश्वासक उत्तर पंतप्रधानांनाही भावल्याचं दिसलं. बचतगटामार्फत अन्य वस्तू गावात बनवू शकता, केंद्र सरकारच्या अँपवर त्या अपलोड करा, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही बरंच काही करू शकता, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videsh

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मुंबईची चिंता आणखी वाढली, नऊ वार्डमध्ये कोरोनाचे २०० पेक्षा जास्त रुग्ण

मुंबईची चिंता आणखी वाढली, नऊ वार्डमध्ये कोरोनाचे २०० पेक्षा जास्त रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

March 29, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बंद दरवाजा उघडताच दिसला भाच्याचा मृतदेह; मंगळवेढ्यात एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा

March 28, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

March 28, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! मंगळवेढ्यात अज्ञात दुचाकीच्या धडकेत ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ; पालकांनो मुलांची काळजी घ्या

March 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा