mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातुन बाहेर जाण्यासाठी व जिल्ह्यात येण्यासाठी काय कराल ? जाणुन घ्या एका क्लिक वर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर जिल्ह्यातुन बाहेर जाण्यासाठी व जिल्ह्यात येण्यासाठी काय कराल ? जाणुन घ्या एका क्लिक वर

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये अडकलेल्या नागरिक, विदयार्थी, पर्यटक आणि मजूर यांना आपआपल्या गावी जाण्यासाठी तसेच सोलापूर जिल्हयात येण्यासाठी राज्य शासनाने कार्यप्रणाली जाहीर केली आहे. आता जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने जिल्हा बाहेर व परराज्यात जाता येणार आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परिपत्रक शनिवारी जारी केले आहे.

देशात पुन्हा 17 मेपर्यंत लॉकडॉऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडॉऊनमध्ये जिल्हयातील, राज्यातील, कामगार , विद्यार्थी अडकले आहेत. त्यामुळे त्यांना स्थलांतर करण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नवीन परिपत्रक जारी केले आहे. यासाठी प्रवास पास मिळणेसाठी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

त्यासाठीचा अर्ज  एचटीटीपीएस:/इनकोव्हीड19.एमएचपोलीस. इन या वेबसाईट वर संपर्क साधावा.

सोलापूर जिल्हयातून इतरत्र जाणेसाठी 

1.सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हददीतील नागरिकांना पोलीस आयुक्तालयाकडून प्रवासासाठीची परवानगी देण्यात येईल. त्यासाठी संबंधितांनी वरील वेबसाईटवर निवासाचे ठिकाण सोलापूर शहर (Solapur City) असे निवडावे. त्यानुसार परिपूर्ण अर्ज भरावा. तसेच सोलापूर जिल्हयातील ग्रामीण भागात रहिवास असणा-या व्यक्तींनी वरील वेबसाईटवर निवासाचे ठिकाण सोलापूर ग्रामीण (Solapur Rural) असे निवडावे, त्यानुसार परिपूर्ण अर्ज भरावा.

2.सदर ऑनलाईन अर्ज भरत असताना आपला फोटो, आधारकार्ड अगर तत्सम फोटो ओळखपत्र, नोंदणीकृत वैदयकीय व्यावसायीक यांचेकडून कोविड-१९ ची लक्षणे व बाधा नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.  अनुषंगिक सर्व माहिती तपशीलासह भरणे आवश्यक आहे. 

Procedure to getting e-PASS for travelling.
प्रवासासाठी ई-पास करण्याची प्रक्रिया@MahaDGIPR @InfoDivPune @AnilDeshmukhNCP@SpSolapurRural @solapurpolice pic.twitter.com/ON4bhKJimG

— SOLAPUR RURAL POLICE #StayHome #StaySafe???? (@SpSolapurRural) May 2, 2020

3.वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सोलापूर पोलीस आयुक्त आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रवासासाठी परवानगीबाबतचा प्रस्ताव ज्या जिल्हयात जायचे आहे, त्या  पोलीस आयुक्त / जिल्हाधिकारी यांना पाठविणेत येईल. 

4.संबंधित पोलीस आयुक्त/ जिल्हाधिकारी यांचेकडून प्रवासासाठी मान्यता प्राप्त झाल्यानंतरच पोलीस आयुक्त/ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अर्जदारास ऑनलाईन पध्दतीनेच प्रवासासाठीची अंतिम परवानगी देणेत येईल. सदर पास डाऊनलोड करुन जतन करावा.

5.पोलीस आयुक्त/  जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम परवानगी दिलेनंतरच अर्जदारानी प्रत्यक्ष प्रवासास सुरुवात करावी.  

6.परवानगी मिळालेली व्यक्ती ज्या वाहनाने प्रवास करणार आहेत, अशा वाहनांना प्रवासाचा निश्चित मार्ग व कालावधी नमूद करुन देणेत आलेला पास, सर्व प्रवाशांचे ओळखपत्र, सर्व प्रवाशांचे वैदयकीय प्रमाणपत्र सोबत असणे बंधनकारक असणार आहे.

7.वरीलप्रमाणे देण्यात येणारी परवानगी घोषित करण्यात आलेल्या आणि यापुढे वेळोवेळी घोषित करण्यात येणा-या containment Zone मधील व्यक्तींना दिली जाणार नाही. 

सोलापूर जिल्यातील ग्रामीण भागातील ज्या नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यामध्ये अडचणी आल्यास त्यांनी संबंधित ग्रामपंचायत/ग्रामस्तरीय समिती/तहसिल कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा.

सोलापूर जिल्हयात येणेसाठी


1.सोलापूर जिल्हयातील इतर राज्यात अगर इतर जिल्हयात अडकलेल्या मजूर, यात्रेकरु , विदयार्थी, पर्यटक,  व्यक्ती यांनी त्यांच्या स्वगृही येणेसाठी ते ज्या ठिकाणी अडकलेले आहेत, त्याठिकाणच्या पोलीस आयुक्त/ जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे प्रवासाच्या परवानगीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. 

2.सदर प्रवासासाठी सध्याचे रहिवास असलेल्या ठिकाणचे संबंधित पोलीस आयुक्त/ जिल्हाधिकारी यांचेकडून प्रवासाबाबत प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर सोलापूर पोलीस आयुक्त/जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याबाबत ना-हरकत/अनुमती प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यानंतर ज्या ठिकाणी अर्ज सादर केलेला आहे, त्या पोलीस आयुक्त/ जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्रवासाचा पास प्राप्त करुन घेणे आवश्यक राहील.

3.सोलापूर जिल्हयामध्ये प्रवेश करु इच्छिणा-या व्यक्तींनी मिळालेला परवानगी पास, सर्व प्रवाशांचे ओळखपत्र, सर्व प्रवाशांचे वैदयकीय प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे.

4.सदर सर्व कागदपत्रांची शहानिशा करुन सोलापूर जिल्हयाचे हददीत प्रवेश देणेत येईल.

5.सोलापूर जिल्हयात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करणेत येईल, सदर तपासणी करणेसाठी जिल्हास्थल सिमा हद्दीवरील चेकपोस्टवर आरोग्य पथके नेमणेत आलेली आहेत.  सोलापूर जिल्हयात प्रवेश केलेल्या प्रत्येक प्रवाशांनी स्थानिक प्रशासनास (तहसिलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, वॉर्ड ऑफिसर, ग्रामसेवक, तलाठी ) यांना बाहेरुन जिल्हयात आल्याबाबतची माहिती देणे बंधनकारक आहे. 

6.अशा प्रवाशांना सक्तीने 14 दिवस होम क्वारंटाईन (Home Quarantine) किंवा इन्स्टिटयुशनल क्वारंटाईन (Institutional Quarantine) करणेत येईल.  या संदर्भात काही शंका असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी कार्यालय टोल फ्री क्र. 1077  

जिल्हा पुनर्वसन कार्यालय, सोलापूर 0217-2731007  पोलीस आयुक्त कार्यालय (सायबर सेल), सोलापूर

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
Breaking : सोलापुरात 3 नवे कोरोना पॉझिटिव्ह ; ‘या’ भागात आढळले रुग्ण संख्या 114 वर

Breaking : सोलापुरात 3 नवे कोरोना पॉझिटिव्ह ; 'या' भागात आढळले रुग्ण संख्या 114 वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर ‘या’ पक्षाचे वर्चस्व; सभापतीपदी सुनंदा आवताडेसह यांच्या झाल्या निवडी

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

शेतकऱ्यांनो! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंगळवेढा बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीस आणू नये

January 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा