मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूरात आज शनिवारी 3 नवीन कोरोनाग्रस्तांची भर झाली असून एकूण रुग्ण संख्या 114 वर गेली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
आज शनिवारी 32 अहवाल प्राप्त झाले होते. त्यामध्ये 29 निगेटिव्ह आले तर 3 पॉझिटिव्ह निघाले आहेत. तर प्रलंबित अहवाल 299 आहेत.
नवे रुग्ण गवळी वस्ती,आकाशवाणी रोड 1 व पोलीस मुख्यालय,अशोक चौक 2 असे तीन रुग्ण आढळले आहेत.
कोरोनामुक्त झालेल्या 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजतागायत 6 मृत्यू झाल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
——————–
ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज